१ प्राण्यांचा जीवनक्रम स्वाध्याय
(अ) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) कोंबडीला अंडी का उबवावी लागतात?
👉अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडीला अंडी उबवावी लागतात.
(२) अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते ?
👉 जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते, तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रक बनते. अंड्यांच्या जवळ कोणी गेले, तर ती त्याच्या अंगावर धावून जाते.
(३) फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था कोणत्या ?
👉 फुलपाखराच्या वाढीच्या चार अवस्था पुढील प्रमाणे
1. अंडे
2. अळ
3. कोष
4. प्रौढ ( प्रत्यक्ष फुलपाखरू )
(४) कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होतात ?
👉 कोशाच्या आत बिबळ्या कडवा अकरा किंवा बारा दिवस असतो. या अवस्थेत तो काहीही खात नाही. पण त्याने स्वतःभोवती निर्माण केलेल्या आवरणाच्या आत त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. पायांची लांबी वाढते. आकर्षक पंख निर्माण होतात.
(ब) चूक की बरोबर ते सांगा.
(१) शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते.
👉 चूक.
(२) मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत.
👉 बरोबर.
(३) अंड्यांतून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते.
👉 चूक
(क) गाळलेले शब्द भरा.
(१) फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर ...... घालते.
👉 फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अळी घालते.
(२) फुलपाखरांच्या ...... सुरवंट म्हणतात.
👉 फुलपाखरांच्या अळीला सुरवंट म्हणतात.
हे पण वाचा 👇
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकतात.
0 टिप्पण्या