2 सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | Sajivanche Parasparanshi Nate Swadhyay 4thi

२ सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय


अ) काय करावे बरे ? 

१) गुरप्रीतकौरला ऐन उन्हाळ्यात भर दुपारी सुटीतील छंदवर्गाला जायचे आहे. तिला उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी योग्य त्या सुचना द्यायच्या आहेत. 
👉१) गुरप्रीतकौरने सुती कपडे घालावेत.  
२) भरपूर पाणी किंवा लिंबू सरबत प्यावे.  
३) डोक्यावर टोपी घालावी.  
४) उपाशीपोटी छंदवर्गात जाऊ नये.

(आ) विचार करा.

१) शेतात पीक उभे आहे. अशा वेळी जोराच्या पावसाने शेतात पाणी साचले तर पीक सडून जाते. त्याचे कारण काय असेल ? 

👉शेतात दोन-तीन दिवस पाणी साचल्यावर पिकांची मुळे कुजू लागतात. मुळे कुजली की हळूहळू सर्वच रोपटे सडू लागते. पिकात तयार होत असलेले दाणे किंवा धान्य पावसाच्या माऱ्याने गळून पडते. यामुळे सडण्याची क्रिया अजून वेगाने होते. अशा रितीने उभ्या पिकाची पावसाच्या माऱ्याने हानी होते. 

(२) एखादया वर्षी पाऊस कमी पडतो, त्या वर्षी शेते का पिकत नाहीत ? 

👉पिकांना वाढीसाठी पुरेसे पाणी लागते . पाऊस कमी पडल्यावर पिकांना पाणी मिळत नाही. रोपे जोमाने वाढत नाहीत आणि त्यामुळे शेत व्यवस्थित पिकत नाहीत. 

(३) धामण हा एक सापाचा प्रकार आहे. तो शेताच्या आसपास का राहत असेल ? 

👉 धामण हा बिनविषारी आणि आकाराने मोठा असलेला साप आहे. हा उंदीर खाऊन स्वतःचे पोट भरतो. शेताच्या आसपास धान्यदाणे खायला उंदीर येतात. हे उंदीर खायला धामण शेताच्या आसपास राहते.

(४) बर्फ असणाऱ्या प्रदेशात , अंगावर केस असणारे प्राणी राहत असतील, तर त्यांच्या अंगावर केस दाट असतील का विरळ ? त्याचे कारण काय असेल ?

👉 बर्फ असणाऱ्या प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. कारण दाट केसांमुळे त्यांचे कडाक्याच्या थंडीपासून रक्षण होते . अंगातील ऊब टिकून राहते. 

(इ) माहिती मिळवा. 

१. महाराष्ट्रात पुढील ठिकाणे कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहेत ? 

      (क) नागपूर - संत्री 

      (ख) घोलवड - चिकू 

      (ग) सासवड - अंजीर 

      (घ) देवगड - आंबा 

      (च) जळगाव - केळी 

२. या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील त्याची माहिती मिळवा आणि लिहून काढा. 

👉 या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरात वाढतात. कारण त्या गावातील हवामान, मृदा या फळझाडांच्या वाढीसाठी अनुकूल असते. म्हणून या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरात वाढत असतील. 

(ई) खालील प्रश्नांची उत्तरे दया.

(१) वनस्पतींचा आपणांस कोणकोणता उपयोग होतो ?  

👉 १. वनस्पतीं कडूनच आपल्याला अन्नधान्ये, भाजीपाला, फळ इत्यादी मिळते.  

२. आपल्याला निरनिराळ्या कारणांसाठी फुले हवी असतात. तेही वनस्पतीच आपल्याला देतात.  

३. आपल्याला कापड तयार करण्यासाठी कापूस लागतो, तोही वनस्पतींकडून मिळतो.  

४.  वनस्पती आपल्याला ऑक्सिजन पुरवतात.  

२) वृक्षवासी प्राणी कोणाला म्हणतात ?

👉 स्वतःच्या जीवनातला जास्तीत जास्त वेळ झाडांवर घालवणारे प्राणी म्हणजेच वृक्षवासी प्राणी होय. माकडे, खारी असे झाडावर राहणारे प्राणी हे वृक्षवासी आहेत. 

३) मार्च महिना सुरू झाला, की झाडांमध्ये काय बदल होतो ?

👉 मार्च महिन्याच्या सुरुवातीला हिवाळा संपून उन्हाळा चालू होतो व त्यामुळे झाडांना नवी पालवी फुटते. झाडावर तांबूस रंगाची नाजूक, कोवळी पाने दिसू लागतात. 

(उ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.  

(१) ............. ऋतू संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो.  

👉 पानगळीचा ऋतू संपला की पुन्हा थंडीचा मोसम येतो.  

(२) आपल्या काही ...... पूर्ण व्हाव्यात, म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. 

👉 आपल्या काही गरजा पूर्ण व्हाव्यात, म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो. 

(३) वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण ........ फावरतो. 

👉 वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कीटकनाशके फावरतो. 

(4) हिवाळ्याचे वर्णन ...... ऋतू असेही करतात.

👉 हिवाळ्याचे वर्णन पानगळीचा ऋतू असेही करतात. 

हे पण वाचा 👇


या ब्लॉगमध्ये तुम्ही सजीवांचे परस्परांशी नाते या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच संपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांचा अभ्यास केला. तसेच तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खालील व्हिडिओ बघावा. 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या