३ साठवण पाण्याची स्वाध्याय
अ) थोडक्यात उत्तरे द्या .
१. पाणी कशासाठी साठवायचे ?
👉आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसाळा तीन ते चार महिने असतो. आपल्यासह सर्व सजीव वर्षभर हे पाणी वापरतात. पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही. म्हणून पाणी साठवावे लागते.
२. पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असतं ?
👉पारंपरिक पद्धतीत घरात कमी घेराचे आड खणले जात असे. या आडांना वर्षभर पाणी असे. आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असे.
३. धरण कशावर बांधतात ?
👉 धरण नदीवर बांधतात.
४. पाण्याचा वापर करतांना कोणती काळजी घ्यावी ?
👉पाण्याचा वापर करतांना पुढील काळजी घ्यावी.
१) अंघोळ करताना, दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे.
२) माठात, पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे.
३) घरातील किंवा शाळेतील एखादा नळ, बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना द्यावी
५. पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
👉 पाण्याची गुणवत्ता, दर्जा घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय. सांडपाणी, टाकाऊ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते.
आ) पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल, याचा विचार करा. त्यासाठी काय करता येईल ते सुचवा.
👉पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी साठून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचविता येईल.
1. घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे.
2. परिसरातील एखादा हौद, विहीर, तलाव तसेच विंधन विहीर बांधणे.
इ) पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लाऊन घ्याव्यात ?
👉पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पुढील सवयी स्वतःला लावून घेता येतील
1. अंघोळ करताना, दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे.
2. माठात, पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे.
3. घरातील किंवा शाळेतील एखादा नळ, बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे.
हे पण वाचा 👇
२ सजीवांचे परस्परांशी नाते स्वाध्याय। परिसर अभ्यास भाग 1 - ४ थी
४ पिण्याचे पाणी स्वाध्याय परिसर अभ्यास भाग १-४ थी
0 टिप्पण्या