4 पिण्याचे पाणी स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | pinyache pani swadhyay 4 thi

४ पिण्याचे पाणी स्वाध्याय

अ)  जरा डोके चालवा .

१) रवा आणि साबुदाणा मिसळल्या गेले आहेत. ते चाळून वेगळे करण्यासाठी चाळणीची भोके कशी हवी.
👉 रवा आणि साबुदाणा  मिसळले गेले असल्यास ते वेगळे करण्यासाठी साबुदाणा पडेल अशी जर चाळणी घेतली तर त्यातून रवाही खाली पडेल. फक्त रवा खाली पडेल अशीं चाळणी घेतली तर रवा व साबुदाणा वेगळे होईल.

(आ) खालील प्रश्नांची योग्य उत्तरे दया.

(१) लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थचे द्रावण आहे ?
👉 लिंबाच्या सरबतमध्ये लिंबाचा रस, साखर आणि मीठ या पदार्थांचे पाण्यात केलेले द्रावण असते.

२) पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले, तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही. याचे कारण काय ?
👉 पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी त्यात अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात. गाळलेल्या स्वच्छ पारदर्शक पाण्यातही सूक्ष्मजीव असू शकतात. असे पाणी पोटात गेल्यास आपल्याला आजार होऊ शकतात.

(३) सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो ?
👉 सरबत करतांना त्यात घातलेली साखर आपण चमच्याने ढवळतो. त्यामुळे साखर लवकर विरघळते.

(४) तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते ?
👉 तेल पाण्यावर तरंगते.









(उ) चूक की बरोबर सांगा.
(१) तूरटीची पूड पाण्यात विरघळत नाही.
👉 चूक

(२) पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत.
👉 चूक

(३) गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो.
👉 बरोबर

(४) खोडरबर पाण्यात तरंगते.
👉 चूक

(५) चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो.
👉 बरोबर

ऊ) पाणी पारदर्शक' होते म्हणजे काय होते ?
👉 पाण्यात तरंगणारे मातीचे कण व इतर कचरा पाण्याच्या तळाशी बसतो, तेव्हा पाणी पारदर्शक होते. ज्या वेळी गढूळ पाण्यात तरटी फिरवली जाते, त्या वेळी तुरटीचे कण पाण्यात पसरतात. या कणांना मातीचे बारीक कण चिकटतात. ते सर्व वजनाने जड असे मोठे कण पाण्याच्या तळाशी जमा होतात. असे पाणी पारदर्शक दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या