2 संतांची कामगिरी स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 2 | Santanchi Kamgiri Swadhyay 4thi



संतांची कामगिरी स्वाध्याय | santanchi kamgiri swadhyay 


तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 

१) संत नामदेव .............  निस्सीम भक्त होते. 

👉 संत नामदेव विठ्ठलाचे  निस्सीम भक्त होते. 

२)  ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ ........... येथे जिवंत समाधी घेतली.

👉 ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली.

३) संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते ........ नदीमध्ये बुडवली.

👉 संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्जखते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली.

४) समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी ........ मंदिरे उभारली.

👉 समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली.


२.  प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते ?

👉 श्रीचक्रधर स्वामींना स्त्री - पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. 

(आ) संत नामदेवांनी लोकांच्या मनांत कोणता निर्धार निर्माण केला ?

👉  संत नामदेवांनी धर्मरक्षणाचा व भक्तीमार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला.

(इ) संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला ?

👉 प्राणी मत्रांवर दया करा हा उपदेश संत एकनाथांनी लोकांना केला.

(ई) समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला ?

👉 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' , हा संदेश समर्थ रामदासांनी दिला.


३. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले ?

👉 संत ज्ञानेश्वर हे एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले ; पण कोणी त्यांना भिक्षा घातली किंवा दिली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. यामुळेच संत ज्ञानेश्वर झोपडीत दर बंद करुन बसले होते.

(आ) संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला ? 

👉  संत तुकारामांनी दया, क्षमा, शांती यांची शिकवण दिली तसेच समतेचा उपदेश केला तो म्हणजे 

      'जे का रंजले गांजले  ।  त्यांसी म्हणे जो अपुले 

      तोचि साधु ओळखावा  । देव तेथेचि जाणावा  ।' 

हा संदेश दिला.



हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ १. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ।  इयत्ता :- ४ थी  ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय ।  पाठ 3. मराठा सरदार भोसल्यांचे - कर्तबगार घराणे ।  इयत्ता :- ४ थी  ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या