मराठा सरदार भोसल्यांचे - कर्तबगार घराणे
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
१. रिकाम्या जागी कांसातील योग्य पर्याय लिहा.
अ) महाराष्ट्रातील शुर घरण्यांपैकी वेरुळचे ......... घराणे मोठे पराक्रमी निघाले.
( मोरे, घोरपडे, भोसले )
👉 महाराष्ट्रातील शुर घरण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.
ब) बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व ...... ही दोन मुले होती.
( विठोजी, शहाजी, शरीफजी )
👉 बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती.
क) निजामशहाचा ....... हा कर्तबगार वजीर होता.
( मलिक अंबर, फत्तेखान, शरीफजी )
👉 निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता.
२. नातेसंबंध लिहा.
अ) मालोजीराजे - विठोजीराजे 👉 भाऊ - भाऊ
आ) शहाजीराजे - लखुजीराव जाधव 👉 जावई - सासरे
इ) शहाजीराजे - शरीफजी 👉 भाऊ - भाऊ
ई) बाबाजीराजे - विठोजीराजे 👉 पिता - पुत्र
४. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ?
👉 घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा मालोजीराजे यांनी केला
आ) निजामशाहाने मालोजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली ?
👉 निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे पर्गण्यांची जहागीर दिली.
इ) निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले ?
👉 निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले.
ई) आदिलशाहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला ?
👉 आदिलशहाने शहाजीराजांना 'सरलष्कर' हा किताब दिला.
उ ) शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले ?
👉 निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले, तेंव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ 2. संतांची कामगिरी । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
स्वाध्याय । पाठ ३. शिवरायांचे बालपण । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
0 टिप्पण्या