4 शिवरायांचे बालपण स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग २ | shivarayanche balapan swadhyay 4thi

4 शिवरायांचे बालपण स्वाध्याय 

शिवरायांचे बालपण स्वाध्याय shivarayanche balapan swadhyay


१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) शिवरायांचा जन्म ....... किल्ल्यावर झाला.

(पुरंदर , शिवनेरी , पन्हाळा) 

👉 शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला.

(आ) आदिलशहाने शहाजीराजांची ......... प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.

(कर्नाटकातील. खानदेशातील, कोकणातील)

👉  आदिलशहाने शहाजीराजांनी कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली.


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) जिजमातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले ?

👉  जिजमातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात असे विचार घोळू लागले की, मोठे झाल्यावर आपणही शुर पुरुशांसारखे पराक्रम करावेत.

(आ) शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत ?

👉  शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे छंद ! लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत.

(इ) शहाजीराजांनी निजामशाहीच्या त्याग का केला ?

👉  निजामशाहीत चिथावणीने लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्त्या करण्यात आली, या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला.


३.  दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) जिजाबाई शिवरायांना कोणकोणत्या गोष्टी सांगत ?

👉 जिजाबाई शिवरायांना रामाच्या नि कृष्णाच्या, नभिमाच्या नि अभिमन्यूच्या तसेच साधुसंतांच्याही गोष्टी जिजाबाई सांगत असे.

(आ) शहाजीराजांनी निजामशाहच्या वंशातील मुलाला निजामशहा म्हणून जाहीर का केले ? 

 👉  वजीर फत्तेखान याने निजामशाहीच्या हत्या केल्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून मुघल बादशहाने मुलुख परस्पद देऊन टाकला. वजीर फत्तेखानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले व त्याला ' निजामशहा ' म्हणून जाहीर केले.


हे पण वाचा 👇👇👇👇👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या