5 शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय
शिवरायांचे शिक्षण स्वाध्याय shivarayanche shikshan swadhyay |
१. रिकाम्या जागी कंसतील योग्य पर्याय लिहा.
(अ) शहाजीराजे ...... गाढे पंडित होते.
(संस्कृतचे, कन्नडचे, तमिळचे)
👉 शहाजीराजे संस्कृत गाढे पंडित होते.
(आ) मावळात राहणाऱ्या लोकांना ..... म्हणतात.
(शेतकरी, सैनिक. मावळे)
👉 मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक कुणी व कोठे केली ?
👉 शिवरायांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक ही शहाजीराजांनी बंगरुळला केली.
(आ) शिवरायांना शिक्षकांनी कोणत्या विद्या शिकवण्यास प्रारंभ केला ?
👉 शिवरायांना शिक्षकांनी घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरविणे, तलवार चालविणे इत्यादी विद्या शिकविण्यास प्रारंभ केला.
(इ) दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेत साऱ्याची सुट का दिली ?
👉 शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजी कोंडदेवांनी शेतकऱ्यांना शेत साऱ्याची सुट दिली.
३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) पुण्याचे रूप कसे पालटले ?
👉 जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला. जिजाबाईनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ-संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
(आ) शिवरायांना कोणत्या विद्या अवगत झाल्या ?
👉 शिवरायांना पुढील विद्या अवगत झाल्या.
1) उत्तम राज्यकारभार कसा करावा,
2) शत्रूशी युद्ध कसे करावे,
3) किल्ले कसे बांधावे,
4) घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी,
5) शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे.
(इ) जिजाबाईंनी कोणता निश्चय केला होता ?
👉 जिजाबाईंनी असा निश्चय केला होता की शिवबा म्हणजेच शिवाजी महाराज हे परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ४. शिवरायांचे बालपण। इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
स्वाध्याय । पाठ ६. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
0 टिप्पण्या