स्वाध्याय । पाठ ७. स्वराज्याचे तोरण बांधले
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(अ) शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व ......... या परगण्यांची जहागीर होती.
( इंदापूर, सासवड, वेल्हे)
👉 शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती.
(आ) शिवरायांनी .......... जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले.
(सिंहगड, शिवनेरी, तोरणा)
👉 शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे, असे ठरवले.
(इ) स्वराज्याची पहिली राजधानी ही ... सजली.
(राजगड, रायगड, प्रतापगड )
👉 स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड सजली.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकमत गाजवत होत्या ?
👉 पुढील चार सत्ता या महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या.
1. दिल्लीचा मुघल बादशहा
2. विजापूरचा आदिलशहा सुलतान
3. गोव्याचे पोर्तुगीज
4. जंजिऱ्याचा सिद्दी
(आ) शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या ?
👉 शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राम्हण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या.
(इ) शिवरायांनी आदिलशाहाला कोणते उत्तर पाठवले ?
👉 शिवरायांनी आदिलशहाला असे उत्तर पाठवले की, ' जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालवा ; म्हणून आम्ही किल्ला घेतला तो आदिलशहाच्या हितासाठीच, यात दुसरा काहीही हेतू नाही.'
३. कारणे लिहा.
(अ) स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली.
👉 तोरणा किल्ला हा एक बळकट आणि प्रचंड असा डोंगरी किल्ला होता. आदिलशहाचे या किल्या कडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी आणि दारुगोळाही नव्हता. म्हणून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी तोरणा किल्ल्याची निवड केली.
(आ) तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या.
👉 तोरणा किल्ल्यावर दुरुस्तीचे काम चालू असताना मोहारांनी भरलेल्या चार घागरी कामगारांना सापडल्या शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे, तिनेच हे धन दिले, अशी कामगारांची भावना झाली. स्वराज्याचे तो धन होते, या भावनेने कामगारांनी एकही मोहरला हात ना लावता त्या घागरी शिवरायांजवळ मोठ्या आनंदाने आणून दिले.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या