6. स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 2 | swarajya sthapanechi pratidnya swadhyay 4 thi

6 स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय


स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा स्वाध्याय swarajya sthapanechi pratidnya swadhyay

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले .......  देवालय मोठे रमणीय स्थान होते.
👉 पुण्याच्या नैर्ऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय  मोठे रमणीय स्थान होते.

(आ) मावळांत ठिकठिकाणी काही .......... मंडळी आपली बतने सांभाळत बसली होती.
👉 मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली बतने सांभाळत बसली होती.

(इ) शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र .......  तयार केली होती.
👉 शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले ?
👉 हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.

(आ) जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला ?
👉 आपण मनी जे धरले ते शिवराय पूर्ण करणार यावर जिजाबाईंना विश्वास वाटू लागला.

(इ) शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडान्खडा माहिती मिळवली ?
👉 शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारूगोळा, हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी यांची खडान्खडा माहिती मिळवली.

 (ई) शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले ?
👉  देशमुख मंडळी वतनासाठी आपसांत भांडत व यामुळे मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात असे. या गोष्टींवर शिवरायांनी आळा घालण्याचे ठरवले. 

३. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) शिवरायांचे ध्येय कोणते होते ?
👉 शिवरायांचे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य ..! तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांच्या गुलामीतून मुक्त व्हायचे.

 (आ) शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला ?
👉  शिवराय आपल्या नव्या उदयोगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरांतील आडमार्ग शोधावे, खिंडी, घाट, चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला.
  

हे पण वाचा 👇👇👇👇👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या