समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
अ
अकंटक :- संकटरहित, अजातशत्रू, निर्विघ्न
अकट :- हट्टी, चिकट, चेंगट, हेरेखोर, हेटक, आग्रही
अकोटीविकट :- प्रचंड, अवाढव्य, बेढब, भयप्रद
अचपळ - खोडकर
अचानक - अनपेक्षित
आ
आई :- माता, माय, माऊली, मातोश्री, जननी, जन्मदात्री, अंबा,
आकर्षक :- मोहक, मनोहर, मनोवेधक, खेच, ओढ
आकर्षण :- मोह, ओढा, मोहिनी, भूलावा
आकाश - आभाळ
आखूड - आकुंचित
आक्रमण - हल्ला
इ
इंद्र :- नाकेश, शक्र, पुरंदर, वासव, अमरेंद्र, अमराधिपती, देवेंद्र
इच्छा :- अभिलाषा, आकांक्षा, कामना, मनीषा, वासना, स्पुहा
इजा :- अपाय, पिडा, उपद्रव
इमानी - प्रामाणिक
इति - अखेर
ई
ईर्षा :- हेवा, मत्सर, असूया, स्पर्धा, चढाओढ, प्रतियोगिता, अहमहमिका
ईश्वर :- परमेश्वर, देव, भगवान, सर्वसाक्षी, परमात्मा, प्रभू, परब्रम्ह, सर्वेश्वर, अनंत, अजन्मा, ईश, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, महाप्रभू, निर्विकार
इहा :- इच्छा, लालसा, स्पृहा, आकांक्षा, अपेक्षा, अभिलाषा
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या