1 आपली पृथ्वी - आपली सूर्यमाला स्वाध्याय
१. काय करावे बरे ?
लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे. ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे. आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे. या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल ?
👉 एकाद्या कृत्रिम उपग्रहांच्या सहाय्याने त्या लघुग्रहाचे तुकडे करता येतील किंवा त्याचा मार्ग बदलता येईल.
२. जरा डोके चालवा.
(१) सूर्य अचानक गडप झाला, तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल?
👉 सर्वत्र अंधार होईल. ऋतू बदलणार नाही. जलचक्र चालणार नाही. झाडांना अन्न तयार करता येणार नाही. झाडे मरून जातो.
(२) असे समजा, की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे. तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे. तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल ?
👉 कु. ( तुमचे स्वतःचे नाव), (तुमचा संपूर्ण पत्ता), (जिल्ह्याचे नाव), (राज्याचे नाव), (देशाचे नाव), (खंडाचे नाव), पृथ्वी , सूर्यमाला, आकाशगंगा.
उदा :- किरण , कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ, ता. चांदवड, जि. नाशिक, राज्य : - महाराष्ट्र, देश :- भारत, आशिया खंड, पृथ्वी, सूर्यमाला, आकाशगंगा.
३. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे, ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा.
👉 बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून.
४. मी कोण ?
(अ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हांला प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो.
👉 चंद्र.
(आ) मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.
👉 सूर्य.
(इ) मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो.
👉 उपग्रह.
(ई) मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
👉 ग्रह.
( उ ) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.
👉 पृथ्वी.
(ऊ) मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे.
👉 सुर्य.
५. (अ) अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात ?
👉 अनेक टन वजनाच्या अवकाश यानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अग्निबाणात प्रचंड प्रमाणात इंधन जाळले जाते त्यामुळे अवकाश प्रक्षेपणात रॉकेट वापरतात
(आ) कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?
👉 शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. या संदर्भात उपग्रह हे माहिती देत असतात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ २. पृथ्वीचे फिरणे । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १
स्वाध्याय । पाठ ३. पृथ्वी आणि सजीवसृष्टी । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १
0 टिप्पण्या