7 आहाराची पोष्टिकता स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1- | aharachi poushtikata swadhyay 4 thi

7 आहाराची पोष्टिकता स्वाध्याय

आहाराची पोष्टिकाता स्वाध्याय | aharachi poushtikata swadhyay



तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


 (अ) काय करावे बरे ?

सुमेध आणि त्याची धाकटी बहीण मधुरा यांना पालेभाज्या आवडत नाहीत. ज्या दिवशी आई पालेभाजी करते, त्या दिवशी ते जेवत नाहीत.

👉 सुमेध आणि मधुरा यांना पालेभाज्यांचे महत्त्व समजावून सांगू. शरीराला त्यांच्यापासून मिळणारे पोषक घटक जसे तंतुमय पदार्थ, खनिजे यांविषयी माहिती देऊन, आईला पालेभाज्यांचे पराठे, थालिपीठ, सूप असे विविध पदार्थ बनवून द्यायला सांगू.


(आ) जरा डोके चालवा.

(१) नुसती ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यापेक्षा भाजणीचे थालिपीठ पोष्टिक का असते ?

👉 भाजणीच्या थालिपीठ ज्वारी किंवा बाजरीचे पीठ, मसाले, डाळी यांचे मिश्रण असते. त्यामुळे या सर्व पदार्थातील पोष्टीक घटक शरीराला मिळतात. त्यामुळे ज्वारीची किंवा बाजरीची यापेक्षा भाजणीचे थालिपीठ पोष्टिक असते. 

(२) भाजीमध्ये दाण्याचे कूट किंवा खोबऱ्याचा कीस घातल्याने पदार्थाचा  पोष्टिकपणा वाढतो की कमी होतो ?

👉 शेंगदाणे आणि खोबरे यात शरीराला लागणारे अनेक पोष्टीक घटक असतात. त्यामुळे दाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा किस भाजीत घातल्याने भाजीचा पोष्टिकपणा वाढतो.

(३) वरणभातवर लिंबू कशासाठी पीळतात  ?

👉 लिंबामध्ये हे जीवनसत्त्व असते. लिंबाच्या रसामुळ वरणभाताची चव व स्वाद वाढतो म्हणून वरण - भातावर लिंबू पीळतात.

(४) शेतात पिकणाऱ्या कोणत्या पिकात साखर जास्त प्रमाणात असते ?

👉 शेतात पिकणाऱ्या ऊस या पिकात साखर जास्त असते.


 (इ) माहिती मिळवा.

दुधाला विरजण लावून दही कसे बनवतात किंवा मटकीला मोड कसे आणतात, त्याची माहिती मिळवा. प्रत्यक्ष प्रयोग करून तुम्हाला जमते का ते पहा.

तुम्ही काय कृती केली ती लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा.

👉 दुधाला विरजण लावून दही करण्याची कृती :- 

१) कोमट दुधात एक चमचा दह्याचे विरजण टाकावे व चांगले मिसळावे.

२) त्यानंतर दूध झाकून ठेवावे.

मटकीला मोड आणण्याची कृती :- 

१) प्रथम मटकी स्वच्छ धुवून पाच ते सहा तास पाण्यात भिजवावी.

२) नंतर मटकीतील पाणी काढून घ्यावे व मटकी एका सूती कपड्यात बांधावी.

३) आठ ते दहा तासात मटकीला मोड येतात.


 (ई) चित्रे काढा.

जी फळे आपण सालासकट खातो अशा फळांची चित्रे काढा व रंगवा.

👉  

सफरचंद 

पेरू




 (उ) यादी करा.

जी फळे आपण सालासकट खाऊ शकत नाही, अशा फळांची यादी करा.

👉 केळी, फणस, अननस, आंबा, संत्री, नारळ.


(ऊ) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(१) फळांमध्ये .............. असल्याने फळे गोड लागतात.

👉 फळांमध्ये साखर असल्याने फळे गोड लागतात.

(२) तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले ......... अन्नपदार्थ आहेत.

👉 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत.

(३) जिभेवरच्या छोट्या - छोट्या उंचवट्यांना ..... म्हणतात.

👉 जिभेवरच्या छोट्या - छोट्या उंचवट्यांना रूचिकलिका म्हणतात


(ए) कारणे सांगा.

(१) अन्नपदार्थ शिजवताना थोडी काळजी घ्यायला हवी.

👉 अन्न शिजवताना अन्नातील काही घटक नष्ट होऊ शकतात. तसेच अन्न जास्त शिजवले तर पोष्टिक घटक नष्ट होऊ शकतात. त्यामुळे अन्न शिजवताना काळजी घ्यायला हवी.

(२) शरीर धडधाकट हवे.

👉 काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते,  तसेच शरीराचे सर्व अवयव कार्यक्षम असतील तरच काम करता येईल त्यामुळे शरीर धडधाकट असायला हवे.


(ऐ) थोडक्यात उत्तरे लिहा.

(१) मोनिका ताईने जिभेची कोणती गंमत सांगितली ?

👉 मोनिका ताईने साखर न खाता पाणी गोड कसे लागते ते सांगितले. तसेच आपल्याला जीभ असून त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या चवी समजतात हे सुद्धा सांगितले.

(२) फळे गोड असतात म्हणजे फळात फक्त साखरच असते का ?

👉 फळे गोड असतात त्यामध्ये साखरेशिवाय इतरही घटक असतात. त्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे घटक व तंतुमय पदार्थ असतात. 

(३) आंबट घटक असणारे अन्नपदार्थ कोणते ?

👉 चिंच, लिंबू, कैरी, टोमॅटो हे आंबट घटक असणारे अन्नपदार्थ आहे.


 (ओ) जोड्या लावा.




हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । ६. अन्नातील विविधता । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ 

स्वाध्याय । पाठ ८. मोलाचे अन्न  । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या