८ आपली पाण्याची गरज स्वाध्याय परिसर अभ्यास 3 री | Apali Panyachi Garaj Swadhyay 3 ri

 ८ आपली पाण्याची गरज 

आपली पाण्याची गरज स्वाध्याय | apli panyachi garaj swadhyay 



तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.


(अ) काय करावे बरे ?

उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी फार वणवण करावी लागते. तुमच्या अवतीभवती असलेल्या प्राण्यांसाठी सोय करायची आहे.

👉 पाण्याचा हौद भरून ठेवावा. सिमेंटच्या टाकीत पाणी भरून ठेवावे. झाडाखाली, सार्वजनिक ठिकाणी तसेच ज्या ज्या ठिकाणी जनावरे येतात त्या त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या भरून ठेवायला पाहिजे.


(आ) जरा डोके चालवा.

(१) आपल्या शरीरात कोणकोणत्या स्वरूपात पाणी असते.

👉 आपल्या शरीरात रक्ताच्या स्वरूपात पाणी असते.

(२) आपण पाणी का पितो?

👉 आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. जेव्हा आपल्या शरीरातील पाणी कमी होते तेव्हा आपल्याला आपोआप तहान लागते. तहान लागली की आपण पाणी पितो.

(३) गाई, म्हशी, शेळ्या पाणवठ्यावर कशासाठी येतात.

👉 गाई, म्हशी,शेळ्या पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येतात.

(४) वनस्पतींमध्ये पाणी असते हे कशावरून समजते ?

👉 काकडीच्या किसात, लिंबाच्या फोडीत तसेच सर्व भाज्या फळे यांच्यात रस असतो व रसात पाणी असते. यावरून वनस्पतींमध्ये पाणी असते हे समजते.

(५) पुरेश्या पाण्याअभावी शेती का करता येत नाही ?

👉 वनस्पतींना जगण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यांना पुरेसे पाणी मिळाले नाही तर त्या जगणार नाही. म्हणून पुरेशा पाण्याअभावी शेती करता येत नाही.

(६) मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज का असते ?

👉  मोठ्या शहरात खूप लोक राहतात. तसेच तेथे कारखानेही असतात. त्यामुळे तेथे जास्त प्रमाणात पाण्याचा उपयोग होतो. म्हणून मोठ्या शहरांना जास्त पाण्याची गरज असते.

(७) जंगलातील वनस्पतींना पाणी कसे मिळते ?

👉 पावसाचे पाणी जमिनीत मुरते. वनस्पतींची मुळे जमिनीत खूप खोलावर पसरलेली असतात. जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात. अशा रीतीने वनस्पतींना पाणी मिळते.


(ई)  रिकाम्या जागा भरा. 

( डुंबत, पाळीव, महत्त्व, पातळ, मुरलेले, जंगली प्राणी )

(१)  पाण्यामुळे रक्त ........ राहते.

👉 पाण्यामुळे रक्त पातळ राहते. 

(२) जनावरे पाण्यात ...... राहतात.

👉 जनावरे पाण्यात डुंबत राहतात. 

(३) लोक ......... प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात.

👉 लोक पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आठवणीने करतात.

(४) ......... पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते.

👉 जंगली प्राणी पाहण्यासाठी जंगलातील पाणवठ्यापाशी जावे लागते.

(५) माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच ........ आहे.

👉 माणसाच्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे. 

(६) जमिनीत ....... पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.

👉  जमिनीत मुरलेले पाणी वनस्पतींची मुळे शोषून घेतात.  


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय । पाठ ७. आपले गाव आपले शहर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय ।  पाठ ९. पाणी नक्की येते कोठून   ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या