2 पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय 5 वी परिसर अभ्यास भाग 1 | pruthviche firane swadhyay 5 vi

2 पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय 

पृथ्वीचे फिरणे स्वाध्याय  pruthviche firane swadhyay 



१. काय करावे बरे ?

अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे. आजीला थंडीचा त्रास होतो, तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे ?

👉 ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे. दक्षिण गोलार्धात २२ मार्च ते २३ सप्टेंबर या कालावधीत हिवाळा तर २३ सप्टेंबर ते २२ मार्च या कालावधीत उन्हाळा असतो, म्हणून अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला २३ सप्टेंबर ते २२ मार्च या उन्हाळ्याच्या  कालावधीत घेऊन जावे. 


२. जरा डोके चालवा.

(अ) पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात ? 

👉 पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलन होतात.  

(आ) अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे. पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा. मुंबई (महाराष्ट्र), कोलकता (पश्चिम बंगाल), भोपाळ (मध्यप्रदेश), नागपूर (महाराष्ट्र).

👉 कोलकत्ता ( पश्चिम बंगाल ), भोपाळ (मध्यप्रदेश),  नागपूर (महाराष्ट्र),  मुंबई (महाराष्ट्र)


३. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(अ) पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास ........ म्हणतात. 

👉 पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात.

(आ) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास .......... म्हणतात. 

👉 पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात.

(इ) पृथ्वीच्या परिवलनामुळे ...... व ....  होते.

👉 पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसरात्र होते.


४. कशाला म्हणतात ?

(अ) पौर्णिमा 

👉 ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वी कडील संपूर्ण भाग दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात. 

(आ) अमावास्या  

👉 ज्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वी कडील भाग अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात.

(इ) चांद्रमास 

👉  एका अमवस्येपासून पुढील अमवस्येचा काळ याला चांद्रमास म्हणातात.

(ई) तिथी 

👉 चंद्र मासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.


५. प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) विषुववृत्त म्हणजे काय ?

👉 उत्तर व दक्षिण ध्रुव यांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात, पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात.

(आ) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते ?

👉 विषुवृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन गोलार्ध म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध होय.


हे पण वाचा  👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ १. आपली पृथ्वी - आपली सूर्यमाला ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १

स्वाध्याय ।  पाठ ३. पृथ्वी आणि सजीवसृष्टी ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या