स्वाध्याय । पाठ ८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १

 स्वाध्याय ।  पाठ ८. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा 






तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


(१) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) सुविधांचा वापर आपण ........... केला पाहिजे.

👉  सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे.

(आ) आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे ........... असते.

👉 आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते.

(इ) शाळेच्या जडणघडणीत .......... वाटा असतो.

👉  शाळेच्या जडणघडणीत समाजाचा  वाटा असतो.


(२) पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत ?

👉 पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक या महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत,

(आ) सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते ?

👉  सार्वजनिक सेवा, त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांनी मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते.

(इ) प्रत्येक मुला मुलींचा  कोणता हक्क आहे ?

👉 शिक्षण हा प्रत्येक मुला मुलींचा मूलभूत हक्क आहे.


(३) पुढील प्रश्नांची दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो ?

👉  बस, रेल्वे. टपालसेवा, दूरध्वनी, अग्निशमन दल, पोलीस, बँका, नाट्यगृहे, बागबगीचे. पोहण्याचे तलाव यांसारख्या सार्वजनिक सुविधांचा आपण उपयोग करतो. 

(आ) शाळेत शिक्षक - पालक आणि माता- पालक संघ का असावेत ?

👉 १. या संघांमुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो. त्यामुळे शाळेच्या विविध कार्यक्रमात पालकांचा सहभाग वाढतो.

२. शाळा सर्व पालकांचा सारखाच सन्मान करते.

३. शाळेतल्या घडामोडींविषयी आपणही पालकांशी बोलले पाहिजे.

४. शिक्षक व पालक या दोन्हींच्या मदतीने आपण शिकत असतो, त्यांच्यातील देवाण - घेवाण आपल्या फायद्याची असते. 

यामुळे शाळेत शिक्षक - पालक आणि माता - पालक संघ असावेत.


(४) काय होईल ते लिहा.

(अ) मुलामुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही, तर. 

👉 १. मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल.

२. अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल.

३. समाजाचा समतोल विकास होणार नाही,

(आ) समाजाने शाळेला मदत केली नाही, तर.

👉 १. शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही.

२. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रग्रती होणार नाही,

३. शाळेच्या समस्या वाढतील.

(इ) सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला, तर.

👉 १. त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनाला शक्य होईल.

२. त्यांचा दर्जा चांगला राहील.

३. त्याच त्या गोष्टींवर खर्च होणार नाही. त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा किंवा सुविधा मिळू शकेल.


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय । पाठ ७. आपण सोडवू आपले प्रश्न । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १

स्वाध्याय । पाठ ९. नकाशा आपला सोबती। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या