10 पाण्याविषयी थोडी माहिती स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Panyavishayi thodi Mahiti 3 ri

 स्वाध्याय ।  पाठ १०. पाण्याविषयी थोडी माहिती 

10 पाण्याविषयी थोडी माहिती स्वाध्याय  | Panyavishayi thodi Mahiti 3 ri




(अ) काय करावे बरे ? 

थंडीमुळे खोबरेल तेल गोठले आहे. ते पातळ करायचे आहे.

👉 खोबरेल तेल हे गरम करण्यासाठी ते आपण उन्हात ठेऊ शकतो. तसेच गरम पाण्यात खोबरेल तेल ची बॉटल ठेऊ शकतो. अशा पद्धतीने गोठलेले खोबरेल तेल आपल्याला पातळ करता येईल.


(आ) जरा डोके चालवा.

(१) पावसाळ्यात बिस्किटे का सादळतात ?

👉 पावसाळ्यात हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. बिस्किटे हवेतील बाष्प शोषून घेतात त्यामुळे पावसाळ्यात बिस्किटे सादळतात.

(२) पाण्यामध्ये पोटॅशियम परमैंगनेट स्फटिक टाकले तर पाण्याला रंग का येतो ?

👉 पाण्यात जांभळ्या रंगाचे पोटॅशियम परमैंगनेटचे स्फटिक विरघळतात त्यामुळे पाण्याला रंग येतो.

(३) पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने ते पाणी ढवळले तर पाणी गोड का लागते ?

👉 पाण्यामध्ये गूळ टाकून चमच्याने ते पाणी ढवळले तर गूळ पाण्यात विरघळतो व गूळ हा गोड असल्यामुळे पाणीसुद्धा गोड लागते.

(४) हिमालय पर्वताच्या शिखरावर सतत बर्फ साठलेला असतो. त्याचे कारण काय असेल ?

👉 हिमालय पर्वत हे खूप उंच आहे. व तेथील हवामान थंड असल्यामुळे पाणी हे द्रवरूप अवस्थेत न राहता ते स्थायुरुप अवस्थेत राहते. म्हणून हिमालय पर्वतांच्या शिखरावर सतत बर्फ साठलेला असतो.


(ई) प्रयोग करून पहा व प्रयोगाची माहिती लिहा. 

प्रयोगाचे नाव : पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे.

प्रयोगाची माहिती : एका पेल्यामध्ये तो पेला अर्धा भरेल इतके ....... घेतले. त्यात चिमूटभर ...... टाकली. ते पाणी ....... ढवळले.

मला काय आढळले ? 

पाण्यात ...... चे कण जसेच्या तसेच राहिले.

यावरून मला काय उलगडले ?

................. .........................


👉 प्रयोगाचे नाव : पाण्यात रांगोळी विरघळते की नाही ते पाहणे.

प्रयोगाची माहिती : एका पेल्यामध्ये तो पेला अर्धा भरेल इतके पाणी घेतले. त्यात चिमूटभर रांगोळी टाकली. ते पाणी चमच्याने  ढवळले.

मला काय आढळले ? 

पाण्यात रांगोळी चे कण जसेच्या तसेच राहिले.

यावरून मला काय उलगडले ?

................. .........................


(उ) चूक की बरोबर ते सांगा.

(१) पाणी पारदर्शक आहे.

👉 बरोबर.

(२) शुद्ध पाणी निळसर दिसते.

👉 चूक.

(३) पाणी खूप तापवले की पाण्याचा बर्फ होतो.

👉 चूक.

(४) पाण्यात साखर विरघळत नाही.

👉 चूक.


(ऊ) कंसात दिलेले शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

( आकार, पारदर्शक, स्थायुरुप, शुद्ध )

(१) ....... पाण्याला रंग, वास आणि चव नसते.

👉 शुद्ध पाण्याला रंग, वास आणि चव नसते.

(२) पाणी .......... आहे.

👉 पाणी पारदर्शक आहे.

(३) पाण्याला स्वतःचा ..... नसतो.

👉 पाण्याला स्वतःचा आकार नसतो.

(४) बर्फ पाण्याचे ........... आहे. 

👉 बर्फ पाण्याचे स्थायुरूप आहे.


(ए) का ते सांगा.

(१) पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो.

👉 कारण पाण्याला रंग नाही व पाणी हे पारदर्शक आहे म्हणून पाण्यात खिळा पडलेला आपल्याला दिसतो.

(२) पाण्यात साखर घालून पाणी ढवळले की साखर दिसेनाशी होते.

👉 कारण साखर ही पाण्यात विरघळते म्हणून पाण्यात साखर घालून धवळले असता साखर दिसेनाशी होते. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ ९. पाणी नक्की येते कोठून   ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास

स्वाध्याय ।  पाठ ११. आपली हवेची गरज ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या