समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
उ
उकाडा :- रतीब, उष्मा, गर्मी
उक्ता :- ठोकळ
उगवती :- प्राची, पूर्व
उग्र :- भयानक, भेसूर, भयंकर, रौद्र, तापट, रागीट, तीव्र
उगा :- गप्प, फुकट, व्यर्थ, उगीच
ऊ
ऊंधा :- उलटा, विरुद्ध, उफराटा
ऊर्ण :- लोकर, तंतू, धागा
ऊब :- उष्णता, आधार, सुख
ऊर्मी :- तरंग, लहरी, प्रवाह, वाट
ऊहापोह :- विवेचन, वाटाघाटी, विचारविनिमय, चर्चा
ऋ
ऋषी :- मुनी, बैरागी, संन्याशी, तापसी, साधू, तपस्वी, योगी
ऋण :- कर्ज, वजा करणे
ऋणदार :- देणेकरी, ऋणको, ऋणाईत, कर्जदार
ए
एककल्ली :- हट्टी, एकमार्गी, हटवादी, हेकेखोर
एकचित्त :- एकाग्र एकमनाता
एकला :- एकाकी, एकटा
एकात्मता :- एकपणा, एकमेळ, एकरूपता, तादात्म्य
एकी :- एकमती, ऐक्य, एकवाक्यता, एकोपा, संघटन, एकता, जुट, एकाव
एलकी :- चमक, उसण
ऐ
ऐट :- अक्कडबाजी, दिमाख, डौल, तोरा, नखरा, रुबाब
ऐदी :- आळशी, मंद, जड, सुस्त
ऐवज :- संपत्ती, रोकड, मालमत्ता, द्रव्य, रक्कम
ऐश्वर्य :- वैभव, समृद्धी, प्रभुत्व, संपदा, वर्चस्व, श्रीमंती
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | अ - ई । marathi synonyms
समानार्थी शब्द | ओ - अं । marathi synonyms
0 टिप्पण्या