4 पर्यावरणाचे संतुलन स्वाध्याय 5 वी परिसर अभ्यास भाग 1

 4 पर्यावरणाचे संतुलन





तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


१. काय करावे बरे ?

कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे आहेत.

👉  १)  उन लावावे. कडक उन्हामुळे धण्यातील अळ्या, कीटक जगू शकत नाहीत. 

२) धान्य ठेवायच्या डब्ब्यात कडुनिंबाचा पाला ठेवावा. कडुनिंबाच्या वासाने कीटक धान्यात राहू शकत नाही.

३) धान्य साठविण्याची जागा कोरडी असावी व तेथे हवा खेळती असावी म्हणजे धान्यात कीड लागण्याची शक्यता कमी असते.


२. जरा डोके चलावा. 

अन्नसाखळी तयार करा ;

बेडूक, घार, अळी, साप, गवत

👉 गवत > अळी > बेडूक > साप > घार 


३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) अन्नसाखळी म्हणजे काय ? उदाहरण लिहा.

👉 प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत. म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्नसाखळी असे म्हणतात.

उदा. सूर्यप्रकाश > वनस्पती > अळ्या > नाकतोडे > चिमण्या 

(आ) पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते ?

👉 कोणत्याही पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. यामुळे सजीवात परस्पर देवाणघेवाण चालू असते. त्याचप्रमाणे निर्जीव घटकही चक्राच्या स्वरूपात फिरत असतात.पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की, पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.


४. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थाचा वापर आवश्यक आहे ?

👉  प्राणी व वनस्पतींचे मृत अवशेष, प्राण्यांचे मलमुत्र यांपासून सूक्ष्मजीव विघटन प्रक्रियेने पोषक पदार्थ तयार करतात. हे पदार्थ मिळाल्यावरच वनस्पतींची जोमाने वाढ होते.


५. चूक की बरोबर ते लिहा.

(अ) पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो.

👉 बरोबर.

(आ) जैवविविधता जपणे आवश्यक आहे.

👉 बरोबर.

(इ) नाकतोडा पक्ष्याला खातो.

👉 चूक.


हे पण वाचा  👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ ३. पृथ्वी आणि सजीवसृष्टी ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १ 

स्वाध्याय ।  पाठ ५.  कुटुंबातील मूल्ये ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या