2 अबब ! किती प्रकारचे हे प्राणी स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
पाणी साचले की तिथे डास होतात. डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या रोगांचा प्रसार होतो. डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत.
👉 1) पाण्याची डबकी साचू देऊ नये.
2) पाण्याच्या पृष्ठभागावर कीटकनाशकांचा फवारा मारावा.
3) परिसराची स्वच्छता राखावी. डासांच्या अळ्या खाणारे मासे सोडावे.
(आ) जरा डोके चालवा.
(१) भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी ?
👉 भुंगा हा कीटक आहे.
(२) मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे ?
👉 मासा आणि सरडा या दोघांना पाठीचा कणा आहे. दोघांच्या अंगावर खवले आहेत. हा या दोघांमधील सारखेपणा आहे.
(३) अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता ?
👉 वाघ आणि झेब्रा या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात.
(४) वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात ?
👉 वाळवंटातील वाहतुकीसाठी तेथील लोक उंट पाळतात. वाळूवर चालण्यासाठी उंटाला खास खुर असतात. त्याला उष्णतेच त्रास होत नाही. त्याला खूप पाण्याची गरज भासत नाही. म्हणून वाळवंटात राहणारे लोक उंट पाळतात.
(५) मेंढ्या कशासाठी पाळतात ?
👉 कारण की , मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते.
(६) कोंबड्या कशासाठी पाळतात ?
👉 कारण की, कोंबड्यापासून आपल्याला अंडी, मांस, मिळते.
(७) वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा.
👉 चित्ता, खार, हरिण.
(८) उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा,
👉 गरुड, घार,इतर
(९) अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते ?
👉 बिबटे, चित्ते, जिराफ.
(१०) आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते ?
👉 सिंहाच्या नराला आयाळ असते.
(इ) पुढील वाक्य पूर्ण करा.
सर्व कावळे ......... असतात, सर्व पोपट ....... असतात. पण गाईंचा रंग वेगवेगळा असतो. .गाई काळ्या, ........ किंवा ....... असतात.
👉 सर्व कावळे काळे असतात, सर्व पोपट हिरवे असतात. पण गाईंचा रंग वेगवेगळा असतो. गाई काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या असतात.
(ई) माहिती मिळवा आणि वर्गातील मित्रांना सांगा...
शेकरू, हरियाल, गैंडा, सिंह यांपैकी कोणत्याही एका प्राण्याचे चित्र मिळवा. त्याची माहिती गोळा करा. ती माहिती नीट लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा.
👉
(उ) पुढील प्रश्नांची उत्तरे दया.
(१) कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते ?
👉 गाय, मैस आणि शेळी या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते.
(२) घरात उंदीर का नको असतात ?
👉 कारण की, उंदीर हे घरात साठऊन ठेवलेले धान्य फस्त करतात. तसेच घरातील वस्तू कुरतडतात.
(३) माशांचा संचार कुठे असतो ?
👉 माशांचा संचार हा पाण्यात असतो.
(४) अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते ?
👉 सर्व पक्षी हे या गटात येतात. गरुड, कावळा, मोर, कोंबडा, चिमणी, पोपट, इतर.
(५) पक्ष्यांना किती पाय असतात ?
👉 दोन.
(ऊ) चूक की बरोबर ते सांगा.
(१) बगळा पांढरा असतो.
👉 बरोबर.
(२) पोपटाच्या अंगावर खवले असतात.
👉 चूक.
(३) मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्या उपयोगी पडते.
👉 चूक.
(४) पालीच्या अंगावर केस असतात.
👉 चूक.
(५) कोंबडा खूप उंच उडत नाही.
👉 बरोबर.
(ऐ) पुढील प्राणी ओळखा.
(१) घरात जळमटे करणारा.
👉 कोळी.
(२) रंगीबेरंगी.
👉 मोर.
(३) सोंड असलेला.
👉 हत्ती.
(४) वेगाने धावणारा.
👉 हरीण, खार
(ओ) पुढील प्राण्यांना किती पाय असतात ?
(१) साप
👉 पाय नसतात.
(२) गरुड
👉 दोन.
(३) हरिण
👉 चार.
(४) पाल
👉 चार.
(५) माशी
👉 सहा.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १. आपल्या अवतीभवती। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ३. निवारा आपला आपला । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या