स्वाध्याय । पाठ ७. आपण सोडवू आपले प्रश्न
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक .......... बनवतात.
👉 समस्यांकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक तीव्र बनवतात.
(आ) परिसरातील ......... ओळखणे, हीसुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.
👉 परिसरातील समस्या ओळखणे, हीसुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे.
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) सार्वजनिक समस्या म्हणजे काय ?
👉 गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात.
(आ) सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात ?
👉 सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात.
(इ) स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले ?
👉 स्वच्छतेचे महत्व संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पटवून दिले.
३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) ' श्रमदानातून ग्रामसफाई ' ही संकल्पना स्पष्ट करा.
👉 एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते. गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे. अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे.
(आ) शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल ?
👉 शांततेला पूरक असे वातावरण पुढील प्रमाणे तयार करता येईल.
१) समाजातील सर्व मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे.
२) प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे.
३) समाजातील विषमता कमी करून शोषण थांबले पाहिजे.
४) शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे.
४. पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ?
(अ) वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे.
👉 वर्गप्रमुखला वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी त्यास पुढीलप्रमाणे मदत करेल.
१) एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करेल.
२) बडबड करणारे किंवा गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगेल.
३) दुसऱ्या शिक्षकांना बोलावून आनेल,
(आ) गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत.
👉 १) गणित विषयाची शिकविलेलेली उदाहरणे सोडविण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करेल.
२) गणितीय कोडी फळ्यावर लिहून ती विद्यार्थ्यांना सोडवण्यास सांगेल.
(इ) क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघामध्ये वाद निर्माण झाला आहे.
👉 वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे, ते सांगून दोन्ही गटांची समजूत घालीन. वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगेल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या