स्वाध्याय । पाठ ५. कुटुंबातील मूल्ये
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) प्रामाणिकपणा ही आपली ........ असते.
👉 प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.
(आ) सामाजिक जीवनात सर्वांना ......... गरज असते.
👉 सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते.
(इ) आपल्या देशात ........ वृत्तीला विशेष महत्त्व आहे.
👉 आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे.
(ई) समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना ......... करता येते.
👉 समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते.
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) परिसरातील बदलांविषयीचे निर्णय कोणी ह्यायचे असतात ?
👉 परिसरातील बदलाविषयींचे निर्णय हे परिसरातील सर्व नागरिकांनी मिळून घ्यावयाचे असतात.
(आ) सहिष्णुता म्हणज काय ?
👉 आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा विचार करणे म्हणजे सहिष्णुता होय.
(इ) स्त्री - पुरुष समानता म्हणजे काय ?
👉 मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानने म्हणजे स्त्री - पुरुष समानता होय.
(ई) स्त्री - पुरुषांच्या समान गरजा कोणत्या ?
👉 अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत.
३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत आपण कसे सहभागी होतो ?
👉 आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असल्यामुळे आपण एकमेकांची काळजी घेऊन विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरविताना एकमेकांना विचारून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. म्हणजे आपण कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभागी होतो.
(आ) सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते ?
👉 प्रत्येक वेळी आपलेच म्हणणे खरे आहे, असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे, त्यांचेही म्हणणे एकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ४. पर्यावरणाचे संतुलन । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १
स्वाध्याय । पाठ ६. नियम सर्वांसाठी । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १
0 टिप्पण्या