3 निवारा आपला आपला स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते, त्याचे कारण काय असेल ? ती पुन्हा वाढायला हवी.
👉 पक्ष्यांना निवरे मिळविण्यासाठी झाडांची गरज आहे. शहरात वृक्षतोड होते. पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही. शहरातील गोंगाट, वाहनांचा धूर या साऱ्यांचा पक्ष्यांना त्रास होतो. ते शहरात थांबत नाहीत. पक्षांची संख्या वाढावी यासाठी झाडे वाढवली पाहिजेत. पक्ष्यांना दाना - पाणी पुरवले पाहिजे.
(आ) जरा डोके चालवा.
(१) मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारूळ बनवत असतील ?
👉 मातीच्या कणांपासून मुंग्या वरुल बनवतात.
(२) विंचू दगडाखाली सापडतो' असे का म्हणत असतील ?
👉 विंचू दगडाखाली आसरा घेतो. तोच त्याचा निवारा आहे. म्हणून विंचू दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील.
(३) काही कबुतरे आणि काही पारवे जंगल सोडून मनुष्यवस्तीच्या जवळ रहायला आले. काही उंदीरही मनुष्यवस्तीच्या जवळ रहायला आले. काय कारण असेल ?
👉 कबुतरे आणि पारवे इमारतीच्या भिंतीतील खबदाडीमध्ये आसरा घेतात. उंदीरही मनुष्यवस्तीत बिले पोखरून निवारा करतात. या दोघांनाही मनुष्यवस्तीच्या जवळ अन्न पाणी मिळते. म्हणून ते मनुष्यवस्तीच्या जवळ राहायला आले असावेत.
(४) पुढील चित्रांतील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा.
👉
(इ) गाळलेले शब्द भरा.
(१) सगळ्या पक्ष्यांची घरटी ......... नसतात.
👉 सगळ्या पक्ष्यांची घरटी एक सारखी नसतात.
(२) .............. नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो.
👉 शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो.
(३) काही प्राणी निवान्यासाठी स्वतः काहीच .......... करत नाहीत.
👉 काही प्राणी निवान्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत.
(४) वाघ, बिबटे, .......... डोंगराच्या गुहेत राहतात.
👉 वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात.
(ई) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो ?
👉 शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी दोऱ्याऐवजी बारीक वेल वापरतो.
(२) अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुगरणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते ?
👉 सुरगण पक्षी घरटे बांधण्यासाठी काटेरी झाडांची निवड करतो. ज्या फांदीवर घरटे असते ती पाण्यावर झुकलेली असते. ही फांदी खूप उंचीवर असते. त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुरागणीच्या घरट्यात जने अवघड असते.
(३) पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे करतात ?
👉 घरटे बनवण्यासाठी पक्षी गवत व काड्या वापरतात. घरट्याच्या आत घालण्यासाठी कापूस, दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरतात. यामुळे पक्षाचे घरटे आतून मऊ आणि उबदार असते.
(४) सिमेंटने बांधलेल्या घरांत उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत ?
👉 सिमेंटने बांधलेले बांधकाम उंदीर व घुशिंना पोखरता येत नाही. म्हणून सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा येत नाहीत.
(५) अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कुठे निवारा शोधतात ?
👉 अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघळे जुन्या, पडक्या आणि ओसाड इमारतींमध्येही निवारा शोधतात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ २. अबब ! किती प्रकारचे हे प्राणी। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ ४. दिशा आणि नकाशा । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या