स्वाध्याय । पाठ ६. नियम सर्वांसाठी। इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १

 स्वाध्याय ।  पाठ ६. नियम सर्वांसाठी



तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(अ) आपले सामाजिक जीवन ........ आधारे चालते.

👉 आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते.

(आ) स्वतंत्र भारत संविधानाने ........ प्रथा नष्ट केली.

👉 स्वतंत्र भारत संविधानाने अस्पृश्यतेसाठी प्रथा नष्ट केली.

(इ) चुकीच्या रूढी - परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला ....... येते.

👉 चुकीच्या रूढी - परंपरांमुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते.


२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) नियम का तयार करावे लागतात ? 

👉 समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी नियम तयार करावे लागतात. 

(आ) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत ?

👉 आपल्या सामाजिक जीवनात अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत.

(इ) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या ?

👉 गरीबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत.


३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

(अ) कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या ?

👉 १) जातीभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली.

२) सती बालविवाह यांसारख्या रुढींवर कायद्याने बंदी घातली.

३) जादूटोणा, हुंडा पद्धती यांसारख्या पद्धती कायद्याने बंद केल्या.

४) बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवराही बंदी घातली आहे.

(आ) पर्यावरणाच्या रक्षणासाठी निया, का करावे लागतात ? 

👉 १) आपण अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो.

२) आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते.

३) आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे. म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते.


हे पण वाचा  👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ ५.  कुटुंबातील मूल्ये ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १

स्वाध्याय ।  पाठ ७. आपण सोडवू आपले प्रश्न ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या