स्वाध्याय । पाठ ९. प्रतापगडावरील पराक्रम । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

 स्वाध्याय ।  पाठ ९. प्रतापगडावरील पराक्रम 


तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.


१. दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा.

(अ) ता ग प्र ड प  

👉 प्रतापगड 

(आ) व रा य शि 

👉 शिवराय 

(इ) खा अ ज न ल फ 

👉 अफजलखान 


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ)  अफजलखानाने कोणता विडा उचलला ?

👉 अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा ठार मारून आणण्याचा विडा उचलला. 

(आ) प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजलखानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला ?

 👉  'तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशाहकडून सरदारकी देवावितो.' हा निरोप अफजलखानने प्रेमळपणाचे सोंग घेऊन शिवरायांना पाठवला.


३. दोन - तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले ?

👉 अफजलखान चालून येत आहे, हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे, हे शिवरायांनी ओळखले. खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान व सैन्यही छोटे. उघड्या मैदानावर खणापुढे आपला निभाव लागणार नाही. हे ओळखून शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीने सामना देण्याचे ठरवले.

(आ) अफजलखानाच्या भेटीला जातांना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले ?

👉 "गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानीआई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गाडीवर बसवां. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो !"  असे अफजलखानाच्या भेटीला जातांना शिवराय आपल्या सरदारांना म्हणाले. 


४. कारणे लिहा.

(अ) शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला.

👉 कारण प्रतापगडावर चढून जाणे सोपे नाही, तो किल्ला डोंगरात होता, भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चादावयाला मार्ग नव्हता. तसेच तेथे जंगली जनावरेही खूप होती.

(आ) विजापूरचा हाहाकार उडाला.

👉 शिवरायांनी विजापूरचा बलाढ्य सरदार अफजलखान यास ठार मारले. त्याच्या फौजेची दाणादाण उडविली. अफजलखानचा मुलगा फाजलखान कसाबसां निसटला व विजापूरला पोहचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.


हे  पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ८. स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ 

स्वाध्याय । पाठ १०. शर्थीने खिंड लढविली । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या