3 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय 5 वी परिसर अभ्यास भाग 1 pruthvi ani jivasrushti swadhyay 5 vi

3 पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय 

पृथ्वी आणि जीवसृष्टी स्वाध्याय pruthvi ani jivasrushti swadhyay 
.

१. काय करावे बरे ?

उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात.
👉  उन्हातल्या उष्णतेने व घटक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते. हे होऊ नये म्हणून कडक उन्हात फिरू नये. परंतु  कधी  बाहेर जावेच लागले तर हात पाय झाकले जातील असे सुती कपडे घालावे. चेहऱ्यावर रुमाल बांधून संरक्षण करावे घरी परतल्यावर गार पाण्याने हात पाय धुवावे.
 

२. जरा डोके चालवा.

(अ) सूक्ष्मजीव महत्वाचे का आहेत ?

👉  पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत. हे सूक्ष्मजीव वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषापासून  पुन्हा मती व क्षार बनवतात. म्हणून सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत.

(आ) समुद्रातून मिळणारे अन्न, यावर विचार करा, माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा.

👉  १) समुद्रामध्ये जलचर राहतात. त्यापैकी काही जलचर हे माणसाचे अन्न आहेत.

२) समुद्रामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या माश्यांचा माणूस खाद्य म्हणून उपयोग करतो.

३) खेकड्या सारखे  कवचधारी जलचर माणूस आवडीने खातो.

४) समुद्रात आढळणारे विविध प्रकारच्या शैवालचा काही प्रदेशात खाद्य म्हणून वापर केला जातो.

५) समुद्री शैवालांपासून अगार हा पदार्थ मिळवितात आणि त्याचा उपयोग जेली सारख्या पदार्थांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी करतात.

६) आपण जेवणाला चव येण्यासाठी वापरत असलेले मीठ सुद्धा समुद्राच्या पाण्यापासूनच तयार केले जाते.

७) समुद्रातून मिळणाऱ्या माश्यांचा उपयोग मत्स्यशेती करण्यासाठी केला जातो.

८) भारतीय समृद्रातुन मिळणाऱ्या माशांची व इतर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केली जाते.

९) समुद्रातून मिळणारे खाद्यपदार्थ हे समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांचे उपजीविकेचे साधन आहे.

१०) भारतीय समुद्र किनारपट्टीवर राहणारे लोक मोठ्या प्रमाणावर समुद्री खाद्यपदार्थ खातात.


३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) ढग कशाचे बनलेले असतात.

👉  ढग पाण्याच्या सूक्ष्म कनांपासून बनलेले असतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याची वाफ बनते. ही वाफ म्हणजेच बाष्प. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यार मुळे ते वातावरणात उंच उंच जाते. उंचावर जातांना ते थंड होऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात, की आकाशांत ढगांच्या रुपात तरंगत राहतात. अशा प्रकारे ढग बनलेले असतात.

(आ) जिवावरण कशाला म्हणतात. 

👉 शिलावरण, जलावरण व वातावरण या आवरणांतील सजीव त्यांनी व्यापलेल्या भागास जिवावरण म्हणतात.

(इ) तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भुरुपांची यादी करा. त्यांतील कोणत्याही दोन भुरूपांचे वर्णन करा.

 👉 भुरुपांची नावे टेकडी, पर्वत, मैदान, दरी, खिंड, पठार, डोंगर, इत्यादी 

( मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या परिसरात असणाऱ्या भुरुपाची माहिती मिळवून ती माहिती येथे लिहायची आहे )

* टेकडी :- जमिनीवरील उंचवट्याचा भाग म्हणजे टेकडी.

* मैदान :- नैसर्गिक सपाट जमिनीला मैदान म्हणतात.

* डोंगर :- उंच टेकडीला डोंगर  म्हणतात.

* पर्वत :- उंच डोंगराला पर्वत म्हणतात.

* दरी :-  डोंगरावरील खूप खोल व लांबट भागास दरी म्हणतात.


४. पुढील दोन वाक्यांतील भुरुपदर्षक शब्दांना अधोरेखित करा.

(अ) अमिनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.

👉 अमिनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे.

(आ) रिया पठारी भागात राहते.

👉 रिया पठारी भागात राहते.


५. माहिती लिहा.

(अ) बाष्पीभवन 

👉 बाष्पीभवनात द्रवाचे बाशपात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्प होत असते. जमिनीत जिरालेल्या पाण्याचेही बाष्प बनते. बाष्पीभवनाच्या या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते. त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते, तेथे त्याचे संघनन होऊन पावसाच्या रुपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. बाष्पीभवनामुळे जलचक्राची प्रक्रिया सतत चालू राहते.  

(आ) संघनन

👉  बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेस संघनन असे म्हणतात.  

(इ) जलचक्र

👉  बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रुपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत असतात, यालाच जलचक्र असे म्हणतात. 


६. कोणतीही दोन उदाहरणे लिहा.

(अ) हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी 

👉 १. ढग तयार होणे.

२. पाऊस येणे.

(आ) पाणी उपलब्ध असणारे ठिकाण 

👉  १. सरोवर 

२. तलाव


७. जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा.

👉 



हे पण वाचा 👇👇👇👇👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या