बासरीवाला मुलगा
अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात खूप उंदीर होते. घरात, शेतात, दुकानात सगळीकडे नुसते उंदिराच उंदीर होते. त्यामुळें धान्याचे नुकसान होत होते. कोणत्याही परिस्थितीत उंदरांचा नाश करायचा असे गावकरी एके दिवशी ठरवतात. अनेक उपाय करूनही उंदरांचा नाश होत नाही. त्यामुळें गावकरी खूप त्रस्त असतात.
ही गोष्ट शेजारी राहणाऱ्या गावातील एका बासरीवल्या मुलाला कळते. मग तो गावात येतो व गावकऱ्यांना सांगतो की, ' मी या उंदरांचा बंदोबस्त करू शकतो पण त्या बदल्यात तुम्ही मला १०० (शंभर) सुवर्णमुद्रा द्याव्यात.' गावकरी तयार होतात.
मग तो बासरीवाला बासरी वाजवत गावात फिरू लागतो. त्याच्या बासरीच्या आवाजामुळे गावातील सर्व उंदीर त्याच्याकडे आकर्षित होतात व त्याच्यामागे धावू लागतात. तो मुलगा गावाबाहेरील नदीत जातो त्याच्याबरोबर उंदिरही पाण्यात जातात आणि पाण्यात बुडून मरतात.
बसरीवला मुलगा गावकऱ्यांकडून आपल्या कामाचा मोबदला मागतो परंतु गावकरी ठरल्याप्रमाणे त्याला १०० सुवर्णमुद्रा द्यायला नकार देतात. बासरीवाल्याला कळते की गावकरी लबाड आहेत. तो म्हणतो की , ' आता मी तुम्हाला कशी अद्दल घडवतो ते बघा.' तो पुन्हा गावात बासरी वाजवत फिरू लागतो.पण त्यावेळी बासरीच्या आवाजाने लहान मुले त्याच्याकडे आकर्षित होतात व तेही त्याच्यामागे धावू लागतात.
गावकऱ्यांना भीती वाटू लागते की, बासरीवाला उंदरप्रमाने आपल्या मुलांनाही नदीत घेऊन जाईल. त्यामुळें गावकरी त्याला थांबवतात v ठरल्याप्रमाणे १०० सुवर्णमुद्रा देतात.
तात्पर्य :- जो आपल्यावर उपकार करतो त्याला कधीही विसरू नये.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
सोन्याची अंडे देणारी कोंबडी | मराठी बोधकथा | marathi bodhakatha
0 टिप्पण्या