स्वाध्याय । पाठ १८. माझे कुटुंब आणि घर
(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) कुटुंबात कोणत्या गरजा पूर्ण होतात ?
👉 कुटुंबात आपली अन्न, वस्त्र आणि निवारा यांची गरज पूर्ण होते.
(२) आजारपणात आपली देखभाल कोण करते ?
👉 आजारपणात आपले आई-वडील आपली देखभाल करतात.
(३) विस्तारित कुटुंबाचे सदस्य केव्हा एकत्र येतात ?
👉 विस्तारित कुटुंबाचे सदस्य सण-उत्सव अशा वेगवेगळ्या प्रसंगी एकमेकांना भेटतात.
(४) उत्सवात कोणत्या बाबींची रेलचेल असते ?
👉 उत्सवात गाणी, रांगोळ्या, खेळ, स्पर्धा शर्यती यांची रेलचेल असते.
(आ) योग्य / अयोग्य लिहा.
(१) अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी.
👉 योग्य.
(२) घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजे.
👉 योग्य.
(३) कचरा कचरापेटीत टाकू नये.
👉 अयोग्य.
(४) ध्वनिप्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत.
👉 योग्य.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १७. सुंदर दात, स्वच्छ शरीर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ १९. माझी शाळा । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या