स्वाध्याय । पाठ १७. सुंदर दात, स्वच्छ शरीर
(अ) काय करावे बरे ?
मित्राचा दात दुखतो आहे. तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही. पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे.
👉 मित्राच्या मनातील डॉक्टरांची भीती दूर करू. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर तुझ्या दुखणाऱ्या दाताची पाहणी करून त्यावर इलाज करतील. त्यामुळे तुझे दुखणे कमी होऊन थांबेल. जर तू डॉक्टरांकडे गेला नाहीस तर तुझे दुखणे जास्त वाढेल.
(आ) जरा डोके चालवा.
(१) दात स्वच्छ करण्याची सर्वांत चांगली पद्धत कोणती ? का ?
👉 ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. ब्रश वापरल्याने दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात. पेस्टच्या फेसाने दातांच्या फटीमध्ये अडकलेले कण बाहेर पडायला मदत होते.
(२) नखे का वाढू देऊ नयेत ?
👉 वाढलेल्या नखात घाण अडकून राहते. आपण हातांनी काही खाताना किंवा जेवताना ही घाण आपल्या पोटात जाते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात. हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत.
(३) बाजारातून आणलेली द्राक्षे धुऊन खाण्याची गरज का असते ?
👉बाजारातून आणलेल्या द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते. द्राक्ष मळेवाल्याने त्यावर कीटकनाशके, औषधे फवारलेली असतात. द्राक्ष न धुता तशीच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल. त्यामुळे बाजारातून आणलेली द्राक्षे धुऊन खाण्याची गरज असते.
(४) सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते, त्याचे कारण काय ?
👉 दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते, त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात. रात्रभर कुजलेले अन्नकण तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल. तोंडाला घाणेरडा वास येईल. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्वाचे असते.
(५) बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत का आहे ?
👉 घराबाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणांनी अस्वच्छ होतात. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो. म्हणूनच बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे.
(इ) गाळलेले शब्द भरा.
(१) ............... ............. सातव्या-आठव्या वर्षी पडतात.
👉 दुधाचे दात सातव्या-आठव्या वर्षी पडतात.
(२) कुजलेले ............... तोंडात राहिले, की त्याचा परिणाम होऊन दात पडतात.
👉 कुजलेले अन्नकण तोंडात राहिले, की त्याचा परिणाम होऊन दात पडतात.
(३) ब्रश आणि ............... वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात.
👉 ब्रश आणि पेस्ट वापरली तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात.
(४) दात घासताना .......... आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात.
👉 दात घासताना जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात.
(५) पाच ................ स्वच्छता ठेवायला हवी.
👉पाच ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवायला हवी.
(ई) खालील प्रश्नांची उत्तरे दया.
(१) हिरड्या खराब का होतात ?
👉 अन्नाचे कण तोंडात राहिले तर ते दातांना आणि जिभेला चिटकून नसतात. दातांमधील फटिंमध्ये अडकतात. ते तसेच तोंडात राहिले तर कुजतात. त्यामुळे तोंडाला घाण वास येतो. असेच वारंवार होत राहिले तर हिरड्या खराब होतात.
(२) काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे ?
👉 तोंडात चुळ भरावी. दातांवरून आतून आणि बाहेरून बोट फिरवावे. खुळखुळून पाच - सहा वेळा चुळा भराव्यात.
(३) जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत ?
👉 दिवसभरात अनेक कारणांवरून आपले हात अस्वच्छ होतात. तसेच घाणेरड्या हातांनी जेवण केले, तर ती घाण पोटात जाते. पोट बिघडते. म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत.
(४) तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते ?
👉 1. ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दतांमधील फटी निट स्वच्छ करता येतात.
2. पेस्टचा फेस होतो. त्यामुळे फटिंमध्ये अडकलेले अन्नकण बाहेर पडायला मदत होते. हे फायदे ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे होतात.
(५) स्वच्छता ठेवली नाही तर काय होते ?
👉 स्वच्छता ठेवली नाहीतर वेगवेगळे आजार होऊ शकतात.
(६) दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात ?
👉 दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण आपल्या पोटात जाते. त्यामुळे पोटाचे विकार होतात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १६. ज्ञानेंद्रिये । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ १८. माझे कुटुंब आणि घर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या