13 आपला आहार स्वाध्याय
13 आपला आहार 3 री स्वाध्याय परिसर अभ्यास | Apala Ahar Swadhyay |
(अ) काय करावे बरे ?
शाळा सुटल्यावर हुतुतूच्या सरावासाठी थांबायचे असते. त्या वेळी थकल्यासारखे वाटते. कशातही लक्ष लागत नाही. पण थांबायचे टर आहे.
👉 शाळा सुटल्यानंतर भूक लागलेली असते. त्यामुळे थकल्यासारखे वाटते. म्हणून काहीतरी खाऊन घ्यावे व पाणी प्यावे.
(आ) जरा डोके चालवा.
पुढील यादीतून कामाचे बैठे काम व अंगमेहनतीचे काम असे वर्गीकरण करा.
(१) खो - खो खेळणे (२) तांदूळ निवडणे
(३) सायकल चालवणे (४) पुस्तक वाचणे
(५) झाडलोट करणे (६) डोंगर चढणे
(७) चित्र काढणे (८) ट्रँका उचलणे
(९) बागेतील गवत काढणे
👉 बैठे काम :- तांदूळ निवडणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे
अंगमेहनतीची कामे :- खो - खजो खेळणे, सायकल चालवणे, झाडलोट करणे, डोंगर चढणे, ट्रंका उचलणे, बागेतील गवत काढणे.
(इ) चूक की बरोबर सांगा.
(१) घरी केलेल्या प्रत्येक पदार्थ आवर्जून खावा.
👉 बरोबर.
(२) जाहिरातीतील पदार्थ आवर्जून खावेत.
👉 चूक.
(३) आकर्षक वेष्टणातील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते.
👉 चूक.
(४) सर्वच महागडे पदार्थ आरोग्याला उत्तम असतात.
👉 चूक.
(ई) एका शब्दात उत्तरे द्या .
(१) कोणत्या ऋतूत आमरस केला जातो ?
👉 उन्हाळा.
(२) उसाच्या रसाची गुऱ्हाळ कोणत्या ऋतूत चालू असतात ?
👉 उन्हाळा.
(३) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो.
👉 हिवाळा.
(४) उन्हातून खेळून आल्यावर खूप तहान लागली आहे. तुमच्यासमोर लिंबाचे सरबत आहे. बाजारातून आणलेले शीतपेयही आहे. यातले कोणते पेय घेऊन तहान भागवणे चांगले ?
👉 लिंबाचे सरबत.
(उ) चित्र पहा. यांपैकी कोणाचा आहार जास्त असेल ? का ?
👉 ओझे वाहणाऱ्या काकांचा आहार सर्वात जास्त असेल. कारण ते अंगमेहनतीचे काम करत आहे.
(ऊ) विचार करून उत्तरे द्या.
(१) तीन वर्षाच्या मुलाचे पोट अर्ध्या भाकरित भरते, म्हणून त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरेल का ? कारण सांगा.
👉 तीन वर्षाच्या मुलाला अर्धी भाकरी पुरेशी आहे, पण त्याच्या आईचे पोट अर्ध्या भाकरीत भरणार नाही. कारण मुलापेक्षा आई वयाने मोठी आहे, तसेच ती खूप कामे करते. त्यामुळे तिला जास्त आहार लागणार.
(२) एक माणूस रोज पाच पोळ्या खातो. एकड्या दिवशी तो तापाने फणफणला असेल. त्या दिवशीही पाच पोळ्या खाईल का ? कारण सांगा.
👉 एखादा माणूस रोज पाच पोळ्या खात असेल तरी आजारी पडल्यानंतर तो पाच पोळ्या खाऊ शकणार नाही. कारण आजारी माणसाला भूक कमी लागते, तसेच आजारपणात हलका आहार पचनास योग्य असतो.
(३) प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगवेगळा असतो. त्याची कोणकोणती कारणे असतील ?
👉 प्रत्येक व्यक्तीचा आहार हा त्याच्या वयानुसार व तब्बेतीनुसार वेगळा असतो. ऋतुमाननुसार ही आहारात फरक पडतो. तसेच ज्या प्रदेशात जी धान्य पोकातात, त्याचप्रमाणे लोक तसा आहार घेत असतात.
(४) आईला आजीसाठी भाकरी का कुस्करून ठेवावी लागते ?
👉 आजीचे वय झाले आहे, तसेच वयोमानानुसार तिचे दात पडल्याने तिला व्यवस्थित चावता येत नाही. म्हणून आईला आजीसाठी भाकरी कुस्करून ठेवावी लागते.
(५) ताटात भाजी टाकू नको, असे आईने ताईला का सांगितले असेल ?
👉 ताईला कोबीची भाजी आवडत नव्हती. प्रकृती चांगली राहण्यासाठी सगळे पदार्थ खायला हवे, म्हणून ताटात भजी टाकू नको, असे आईने ताईला सांगितले असेल.
(ए) माहिती मिळवा.
मूग, मटकी, वाल, चवळी, यांना आणण्याच्या कृतीची माहिती मिळवा. लिहून काढा. वर्गातील इतरांना सांगा.
👉 मूग, मटकी, वाल, चवळी यासारखी कडधान्ये एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात रात्रभर बांधून ठेवावीत. दहा ते बारा तासानंतर या कडधान्यांना मोड येतात.
(ऐ) गाळलेले शब्द भरा.
(१) अंगमेहनतीची कामे करणारी व्यक्ती ....... असो वा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळायला हवे.
👉 अंगमेहनतीची कामे करणारी व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळायला हवे.
(२) प्रकृती चांगली हवी असेल तर ........ विषयी काळजी घ्यावी लागते.
👉 प्रकृती चांगली हवी असेल तर आहारा विषयी काळजी घ्यावी लागते.
(३) जाहिरातीतील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा ..... पडतो.
👉 जाहिरातीतील अन्नपदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १२. आपली अन्नाची गरज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ १४. स्वयंपाक घरात जाऊया । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या