15 आपले शरीर स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Apale Sharir Swadhyay 3 ri

15 आपले शरीर स्वाध्याय 

15 आपले शरीर स्वाध्याय 3 री  परिसर अभ्यास | Apale Sharir Swadhyay 3 ri 


(अ) काय करावे बरे ?

 मैत्रिणीचा चष्मा घरी विसरला आहे. वर्गात तिच्या अडचणी सोडवायच्या आहेत. 

👉 मैत्रिणीचा चष्मा घरी विसरल्याने तिला व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे तिला वाचन व लेखन करण्यास मदत करेन.


(आ) जरा डोके चालवा.

मित्राच्या पायाला प्लास्टर आहे. त्याला कोणकोणत्या अडचणी येतील ?

👉 मित्राच्या पायाला प्लास्टर आहे त्यामुळे त्याला व्यवस्थित चालता येणार नाही. मांडी घालून तसेच बेंच वरती व्यवस्थित बस्तही येणार नाही. खेळाच्या तासाला खेळ खेळता येणार नाहीत.


(इ) बरोबर की चूक ते सांगा. 

(१) हाताचा अंगठा  हा आपल्या शरीराचा मुख्य भाग आहे.

👉 चूक. 

(२) पायांच्या मदतीने आपण जिना चढ शकतो. 

👉 बरोबर.

(३) मान पुढे झुकते, ,मागे वाकते.

👉 बरोबर.

(४) धड फक्त कमारेपाशी वाकू शकते.

👉 बरोबर.


(ई) गाळलेल्या जागा भरा.

(१) धाडला पाय जोडलेला असतो, त्या भागाला खुबा म्हणतात.

(२) तंगडी आणि पाऊल जोडणारा पायाचा भाग म्हणजे घोटा.

(३) आपले काही अवयव वाकतात, म्हणून आपण हालचाल करू शकतो.

(४) एका व्यक्तिसरखी दुसरी व्यक्ती दिसत नाही.


(उ) पुढील प्रश्नांची उत्तर लिहा.

(१) शरीराचे कोणकोणते भाग मिळून धड बनते ?

👉 छाती, पोट व पाठ यांचे मिळून धड बनते.

(२) हाताचे व पायाचे तीन भाग कोणते ?

👉 दंड, अग्रबाहू व पंजा असे हातचे तीन भाग आहेत. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग आहेत.

(३) डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास काय म्हणतात ?

👉  डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास मान असे म्हणतात.


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ १४. स्वयंपाक घरात जाऊया ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय ।  पाठ १६. ज्ञानेंद्रिये ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या