11 आपली हवेची गरज स्वाध्याय । इयत्ता :- 3 री । विषय :- परिसर अभ्यास | Apali Havechi Garaj Swadhyay 3 ri

 स्वाध्याय ।  पाठ ११. आपली हवेची गरज 




(अ) काय करावे बरे ? 

गर्दीच्या ठिकाणी श्वास घुसमटायला लागला आहे ?

👉 गर्दीपासून दूर मोकळ्या मैदानात जावे.


(आ) गाळलेले शब्द भरा.

(गरज, हवा, श्वासोच्छ्वास)

(१) ........... चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर - खाली होत असते. 

👉 श्वासोच्छवास चालू असल्याने झोपलेल्या माणसाची छाती वर - खाली होत असते. 

(२) .......... आपल्या अवतीभवती पसरली आहे. 

👉 हवा आपल्या अवतीभवती पसरली आहे. 

(३) माणसाप्रमाणेच इतर साजिवांनाही हवेची ..... असते.

👉 माणसाप्रमाणेच इतर साजिवांनाही हवेची गरज असते.


(इ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

(१) फुगा फुगवतांना फुग्यात तुम्ही काय भरता ?

👉 फुगा फुगावतांना फुग्यात आम्ही हवा भरतो.

(२) आपल्याला हवेची गरज का असते ?

👉 आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालयाला हवे. यासाठी आपल्याला हवेची गरज असते.

(३) कुत्रा श्वसन करतो हे तुम्हाला कसे कळले ?

👉 कत्याची छाती वर - खाली होतांना दिसते. यावरून कुत्रा श्वसन करतो हे आपल्याल कळते.

(४) मांजराला हवेची गरज कशासाठी असते ? 

👉 मांजराला हवेची गरज श्वासोच्छवासासाठी असते.


(ई) चूक की बरोबर ते सांगा. 

(१) हवा आपल्याला दिसते.

👉 चूक.

(२) मासे श्वास घेताना पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करतात.

👉 बरोबर. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ १०. पाण्याविषयी थोडी माहिती।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय ।  पाठ १२. आपली अन्नाची गरज ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या