12 आपली अन्नाची गरज स्वाध्याय
12 आपली अन्नाची गरज स्वाध्याय | Apali Annachi Garaj Swadhyay |
(अ) काय करावे बरे ?
एका कुंडीतील रोपटे वाढत नाही असे दिसते आहे. त्याची वाढ चांगली व्हायला हवी.
👉 रोपाला सूर्यप्रकाश योग्य मिळतो का ते पाहू. त्यासोबत पाणी व खते वेळोवेळी देवू.
(आ) जरा डोके चालवा.
(१) प्राणी आणि वनस्पती यांच्यातला कोणता फरक या पाठातून तुमच्या लक्षात आला ? कोणता फरक याआधी तुम्हाला माहिती होता ?
👉 प्राणी निसर्गात तयार होणारे आयाते अन्न शोधून खातात. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करतात. प्राणी स्वतःहून हालचाल करतात. वनस्पती स्वतःहून हालचाल करत नाहीत,
(२) खाली दिलेल्या प्राण्यांच्या यादीतून मांस खाणारे आणि मांस न खाणारे प्राणी वेगळे काढा.
सिंह, हत्ती, गाढव, लांडगा, हरीण, शार्क मासा.
👉 मांस खाणारे :- सिंह, लांडगा, शार्क मासा
मांस न खाणारे :- हत्ती, गाढव, हरीण.
(३) वाघही मांस खातो, गिधाडेही मांस खातात. पण दोघांच्या मांस खाण्याच्या पद्धतींत फरक आहे, तो कोणता ?
👉 वाघ जिवंत प्राण्यांचे शिकार करून मांस खातात. गिधाडे मेलेल्या प्राण्यांचे मांस खातात. ते शिकार करत नाहीत.
(इ) तक्ता तयार करा .
खाली दिलेल्या तक्त्यातील प्राणी वनस्पतींचा कोणता भाग खाऊन पोट भारतात ते लिहून कोष्टक पूर्ण करा.
(ई) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) पुरेसे अन्न मिळाले नाही, तर त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ?
👉 पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही.
(२) हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत का येतात?
👉 हिंस्र प्राण्यांना कधीकधी शिकार मिळत नाही. त्यावेळी त्यांची उपासमार होते. तेंव्हा हिंस्र प्राणी माणसांच्या वस्तीत येतात.
(३) माणसाच्या वस्तीत येऊन कोल्हे गाईची शिकार का करत नाही
👉 कोल्ह्यांच्या अंगात वाघाइतकी ताकद नसते, त्यांना गुरे मारणे अवघड जाते म्हणून कोन्हे गाईची शिकार करता नाही.
(उ) पुढे दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर माहिती लिहून काढा.
(१) वनस्पती आपले अन्न कसे तयार करतात ?
👉 वनस्पतींची मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात, हे पाणी वनस्पतींच्या पनांपर्यंत पोहोचते. पानावर असलेल्या छिद्रातून हवा पानांच्या आत शिरते. पानांवर सूर्यप्रकाश पडला , की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करते.
(२) माणसाला अन्नाची गरज कशासाठी असते ?
👉 माणसाच्या शरीराचे काम व्यवस्थित चालायल हवे. त्यासाठी अनाची गरज असते. अन्नामुळे शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते.अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते.
(३) पाळीव प्राण्यांचे अन्न.
👉 गाई, म्हशी, पाळणारे लोक त्यांना गवत, आंबोन आणि पेंढ देतात. घोड्यांना गवत व भिजवलेला हरभरा देतात. शेळ्या व मेंढ्या गावात व खुडपांचा पाला खातात. मांजर दूध पिते. कुत्रे पोळी, भाकरी व मांस मासळी खातात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ११. आपली हवेची गरज । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ १३. आपला आहार । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या