Arunima Sinha | अरुणिमा सिन्हा मराठी माहिती

 अरुणिमा सिन्हा 

अरुणिमा सिन्हा बावीस वर्षांची, उत्तर प्रदेशात राहणारी मुलगी. एकदा रेल्वेगाडीतून प्रवास करताना तिची चोरांशी झटापट झाली. या झटापटीत ती डब्यातून बाहेर फेकली गेली. शेजारच्या | रुळावरून दुसरी गाडी धावत होती. अरुणिमा त्या गाडीखाली पडली आणि तिला गंभीर दुखापत झाली.


डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला, परंतु त्यांना अरुणिमाचा एक पाय कापावा लागला. इस्पितळात असताना अरुणिमाला अनेक लोक भेटायला यायचे. प्रत्येकाला वाटायचे हिचे पुढे कसे होणार ? पण तिने ठरवले, की बिलकूल हताश व्हायचे नाही. कोणीही आपल्याला लाचार म्हणू शकणार नाही, असे काहीतरी करून दाखवायचे.


डॉक्टरांनी तिला कृत्रिम पाय बसवला. नवीन पायाची सवय होताच तिने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. अपघातानंतर अवघ्या वर्षातच तिने हिमालयातील एक उंच शिखर सर केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षी एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखरही सर केले.


अरुणिमाच्या या गोष्टीवरून काय शिकायला मिळते ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या