16 ज्ञानेंद्रिये स्वाध्याय
16 ज्ञानेंद्रिये स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Dnyanendriye Swadhyay 3 ri |
(अ) काय करावे बरे ?
'आजोबांना जेवायला बोलावं', असे आईने साकीनाला सांगितले आहे ; पण सकीनाच्या आजोबांना अजिबात ऐकू येत नाही. आईने जेवायला बोलावले आहे, हे सकीना आजोबांना कसे सांगेल ?
👉 सकिना आजोबांच्या जवळ जाईल. त्यानंतर त्यांना खाणाखुणा करून जेवायला चला असे सांगेन.
(आ) जरा डोके चालवा.
(१) कालचे दही आज खराब झाले आहे, खण्याजोगे राहिले नाही, हे तुम्हाला कसे समजते ?
👉 दह्याचा रंग पिवळसर दिसू लागतो. दह्याची चव बिघडते आणि आंबट वासही येतो. म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी जीभ, नाक आणि डोळे या तिन्हींमुळे दही खराब झाली आहे हे समजते.
(२) पुढे स्वयंपाकघरातील पदार्थांची नावे दिली आहेत. त्यांचा रंग कोणता असतो ?
(१) हळद (२) कोथिंबिरीची पाने (३) पिकलेली मिरची (४) मीठ (५) कच्चा टोमॅटो
👉 १. हळद :- पिवळा
२. कोथिंबिरीची पाने :- हिरवा
३. पिकलेली मिरची :- लाल
४. मीठ :- पांढरा
५. कच्चा टोमॅटो :- हिरवा
(इ) पुढील माहिती कोणत्या ज्ञानेंद्रियांमुळे कळते ते लिहा.
(१) पेरू गोड आहे.
👉 जीभ.
(२) बाहेर कोकिळा गात आहे.
👉 कान.
(३) सूर्यफूल पिवळे आहे.
👉 डोळे.
(४) उदबत्तीचा वास चांगला आहे.
👉 नाक.
(५) औषध कडू आहे.
👉 जीभ.
(६) टॉवेल खरखरीत आहे.
👉 त्वचा.
(ई) निरीक्षण करून माहिती लिहा.
विटीदांडू खेळताना विटीला टोला मारायचा आहे. त्या वेळी कोणकोणत्या अवयवांचा उपयोग होतो ? त्यांचा ताळमेळ कसा ठेवला जातो ?
👉 विटीदांडू खेळताना हात, पाय, कंबर, मान व डोळे या अवयवांचा उपयोग होतो. पायावर उभे राहून, कमारेमध्ये वाकून, हातामध्ये दांडू धरून, विटीकडे पाहत टोला मारला जातो.
(उ) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) दाणे भाजताना काकूंनी दोन हातांचा उपयोग कसा केला आहे ?
👉 दाणे भाजताना काकूंनी डाव्या हाताने चिमटा पकडला आहे. चीमत्यात कढई आहे. त्यांच्या उजव्या हातात उलथने आहे. उलथन्याने त्या दाणे परतत आहे.
(२) ज्ञानेंद्रिये म्हणजे काय ?
👉 आजूबाजूच्या परिस्थितीचा माहिती देणारे अवयव म्हणजेच ज्ञानेंद्रिये होय.
(३) ज्ञानेंद्रियांची आपल्याला कोणती मदत होते ?
👉 ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला सभोवतालच्या परिस्थितीची माहिती समजते. डोळ्यांनी आपण पाहतो. नाकाने आपण वास घेतो. कानांनी आपण ऐकतो. जिभेमुळे आपल्याला चवी समजतात. त्वचेमुळे आपल्याला स्पर्शज्ञान होते.
(४) हालचालींमध्ये ताळमेळ का असावा ?
👉 हालचालींमध्ये ताळमेळ नसेल तर चुका होतील. साध्या चुकांमुळे घोटाळे होऊ शकतील. चुका व घोटाळे टाळण्यासाठी हालचालींमध्ये ताळमेळ असावा.
(ऊ) गाळलेले शब्द भरा.
(१) डोळ्यांमुळे वस्तू किती ........... आहे याचा अंदाज येतो.
👉 डोळ्यांमुळे वस्तू किती दूर आहे याचा अंदाज येतो.
(२) .......... कोणत्या दिशेने येतो ते कनांमुळे समजते.
👉 आवाज कोणत्या दिशेने येतो ते कनांमुळे समजते.
(३) हवा ...... आहे हे वासावरून समजते.
👉 हवा कुबट आहे हे वासावरून समजते.
(४) वस्तू गरम आहे हे आपल्याला ......... समजते.
👉 वस्तू गरम आहे हे आपल्याला त्वचेमुळे समजते.
(५) ....... खाऊन जिभेची आग होते.
👉 मिरची खाऊन जिभेची आग होते.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १५. आपले शरीर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
स्वाध्याय । पाठ १७. सुंदर दात, स्वच्छ शरीर । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास
0 टिप्पण्या