2 इतिहास आणि कालसंकल्पना स्वाध्याय 5 वी परिसर अभ्यास भाग 2 | Itihas Ani Kalsankalpana Swadhyay 5 vi

 2 इतिहास आणि कालसंकल्पना  

१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) आपण वापरतो ती दिनदर्शिका ...... वर आधारलेली असते. 

👉 आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवीसनावर आधारलेली असते.

(आ) इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला .....  असे म्हटले

👉  इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला  इसवी सन  पूर्व काळ असे म्हटले


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो ?

👉 कलमापन करण्यासाठी कर्ब १४ विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो.

(आ) इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो ?  

👉 इसवी सनाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ इ. स. १ - १०० असा लिहिला जातो.


३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

(अ) काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय ?

👉 काळाची विभागणी आपण वार, आठवडा, पंधरवडा, महिनं वर्ष अशी क्रमवार करतो. शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्षाचा काळ संपला की एक सहस्त्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखिक विभागणी असे म्हणतात. एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षाची क्रमवार मांडणी केली जाते.

(आ) कालगणना करण्याची एकके कोणती ?

👉 कालगणना करण्याचे एकके पुढील प्रमाणे आहेत. 

सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष, शतक, सहस्त्रक.


४. पुढील तक्ता पूर्ण करा. 


👉 

इतिहासाची काळविभागणी


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । १. इतिहास म्हणजे काय ? ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । ३. पृथ्वीवरील सजीव । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या