1 इतिहास म्हणजे काय ? स्वाध्याय
इतिहास म्हणजे काय स्वाध्याय | Itihas Mhanje Kay Swadhyay |
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला ....... म्हणतात.
👉 भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात.
(आ) इतिहास केवळ ....... च्या आधारे लिहिला जात नाही.
👉 इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) शास्त्रीय पद्धत म्हणजे काय ?
👉 प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.
(आ) स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे ?
👉 स्वातंत्र्यप्राप्तीची घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे.
(इ) इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते ?
👉 इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते.
३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते ?
👉 इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही. भूतकाळातील घटना पुन्हा जसाच्या तशा घडाऊन आणण्याचा प्रयोग कारणे शक्य नसेल ; तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी. तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो. आवश्यकतेनुसार इतर शस्त्रांची ही मदत घेतली जाते ; म्हणूनच हे शास्त्र आहे असे म्हंटले जाते.
(आ) गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात ?
👉 गावातील लोकांच्या मध्ये एकजूट नसेल, एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिका नसेल, तर त्या गावचा विकास खुंटतो. गावातील हेवेदावे, भांडणतंटे यामुळेही गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात.
४. संकल्पचित्र तयार करा.
👉
५. पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा.
इतिहासाचे साधने :- नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडीं, ताम्रपट, वाडे, शिलालेख, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा.
👉
0 टिप्पण्या