समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ क ~
कंदुक :- चेंडू
कर्कश :- कर्णकठोर, बोचणारे
कच :- माघार, अडचण, केस, ब्रह्मदेवाचा पुत्र
कच्चा :- अपरिपक्व, अपूर्ण
कमळ :- राजीव, अंबुज, पंकज, सरोज, पद्म, उत्पल, अब्ज, कुमुद, अरविंद, नलिनी, सरसिज
~ ख ~
खंत :- खेड, खिन्नता
खंदा :- पाणीदार, साहसी, धाडसी, सामर्थ्यवान
खग :- पक्षी, विहंग, द्विज, अंडज
खगोल :- आकाशकटाह, आंतरिक्ष, नक्षत्रखचित
खच :- ढीग, भर, थर, रास, गर्दी, दाटी
~ ग ~
गंगा :- जान्हवी, भागीरथी, विष्णुपदी, त्रिपथगा
गंज :- तांब, गंज, किट
गचांडी :- अर्धचंद्र, मानेला, धक्का
गच्छंती :- समाप्ती, नाश, मृत्यू
गजानन :- गणेश, गणपती, गणराज, गणनायक
~ घ ~
घटस्फोट :- लग्नविच्छेद, काडीमोड
घनघोर :- निबीड, तुंबळ, भयंकर
घनदाट :- गर्द, गहन, निबीड
घमेंडखोर :- बाढाईखोर, अभिमानी, अहंकारी, चढेल, मग्रूर
घर :- गृह, निवास, सदन, गेह, आलव, निलय, अगार, निकेतन, भवन, हवेली, वास्तू, बंगला
घस :- तूट, खोट, बुड, नुकसान, तोटा, घाटा
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | ओ - अं । marathi synonyms
समानार्थी शब्द | च - झ । marathi synonyms | samanarthi sandha
0 टिप्पण्या