समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ ट ~
टंगळमंगळ :- टाळाटाळ, चालढकल, चुकवाचुकव
टकळी :- कापसाचे सुत कडण्याचे यंत्र, प्रांत, प्रदेश, वटवट, बडबड
टणक :- कणखर, मजबूत, कठीण, कडक
टर :- फजिती, निंदा, उपहास, मानहानी
टवाळकी :- थट्टा, निंदा, उपहास, नक्कल, कुचेष्टा
~ ठ ~
ठक :- फसव्या, पंचक, भोंदू, धूर्त, दांभिक
ठळक :- जाड, स्पष्ट, निश्चित, मोठ्ठा, दृढ, निर्विवाद, लक्षणीय, खचित
ठाऊक :- ज्ञात, परिचित, माहीत, विदित
ठाम :- पक्का, स्तिर, दृढ, कायम, निश्चित, अविचल
ठाव :- तळ, बुड
~ ड ~
डंका :- नौबत, नगारा
डंगर :- वृद्ध, म्हातारा
डच्चू :- नकार, अर्धचंद्र, हकालपट्टी
डहाळ :- काट, फांद्या, छाट, कवळ
डाकू :- चोर, दरोडेखोर
डिंक :- डकवणे, खळ
डोके :- मस्तक, शीर्ष, माथा, शिर
डौल :- ऐट, दिमाख, रुबाब
डौलदार :- सुबक, घाटदार, सुंदर
~ ढ ~
ढ :- निर्बुद्ध, ठोंब्या, मठ्ठ, अक्षरशत्रू, अक्कलशून्य
ढग :- अभ्र, घन, मेघ, जलद, अंबुद, पयोधर जलधर, पयोद, तोयद, नीरद, पयोनिधी
ढंग :- व्यसन, चाळा, अयोग्य नाद
ढाणा :- धिप्पाड, दांडगा
ढवळा :- पांढरा, सफेद, धवल
ढिला :- सैल, शिथिल, भोंगळ, सुस्त
ढीग :- ढेर, ढिगारा, रास, थप्पी, शीग
ढेकूण :- मत्कुण, खटमल
ढोंग :- सोंग, पाखंड, बतावणी
ढोर :- गुरे, जनावरे
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | च - झ । marathi synonyms | samanarthi sandha
समानार्थी शब्द | त - ध । marathi synonyms | samanarthi sandha
0 टिप्पण्या