समानार्थी शब्द
समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार)
~ त ~
तंटा :- कलह, भांडण, बखेडा, कज्जा, वादावादी, खडाष्टक
तंतू :- धागा, दोरा
तकवा :- बळ, शक्ती, उत्साह
तकलादू :- बनावट, नकली, कमकुवत
तक्ता :- नकाशा, कोष्टक
तख्त :- सिंहासन, आसन, गादी
तगडा :- सशक्त, बळकट, धिप्पाड, धट्टाकट्टा
तटस्थ :- त्रयस्थ, तिऱ्हाईत, निःपक्षपाती, निरपेक्ष,
तडफ :- हुरूप, उत्कटता, आवेग, जोश, उत्साह
तड :- शेवट, अखेर
तन :- शरीर, देह, अंग, काया, तनू
तप :- ध्यान, मनन, वर्षाचा काळ
तपास :- चौकशी, शोध
तफावत :- फरक, अंतर
तमा :- फिकीर, पर्वा
~ थ ~
थकवा :- ग्लानी, शिण, निरुत्साह
थट्टा :- चेष्टा, मस्करी, उपहास
थडी :- किनार, तिर, काठ, कड
थवा :- समुदाय, जमाव, समूह
थाट :- डामडौल, शेभा, ऐट
~ द ~
दंग :- विस्मित, चकित, निमग्र, गुंग, गर्ग
दंगल :- दंग, धुमाकूळ, धामधूम
दंतुर :- खंडित, तुटक
दगड :- फत्तर, धोंडा, शिला, पाषाण, शीळा, खडक
दया :- कृपा, करुणा, अनुकंपा, अनुग्रह, मेहेरबानी
~ ध ~
धंदा :- व्यापार, व्यवसाय, उद्योग, उदीम
धक्का :- हिसका, प्रहार, आघात, कट्टा, चौथरा
धटिंगण :- उर्मट, दांडगा, अडदांड, धिप्पाड
धडपड :- खटाटोप, खटपट, प्रयत्न
धन :- पैसा, द्रव्य, संपदा, संपत्ती, दौलत, अर्थ
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
समानार्थी शब्द | ट - ढ । marathi synonyms | samanarthi sandha
समानार्थी शब्द | न - ब । marathi synonyms | samanarthi sabdha
0 टिप्पण्या