समानार्थी शब्द | ओ - अं । marathi synonyms

समानार्थी शब्द 



  समानार्थी शब्दांचे विविध संदर्भ ग्रंथांच्या सहाय्याने केलेलं संकलन पुढे दिलेले आहे. (वर्णमालेनुसार


 

ओंगळ :- किळसवाणा, अमंगळ, वाईट, अशुभ, घाणेरडे 

ओकारी :- वांती, उलटी, वीट, त्रास, तिटकारा 

ओघ :- ओढा, प्रवाह, लोंढा, पाठ, ओझर, झरा, नाला 

ओज :- चैतन्य, तेज, उत्साह 

ओझर :- पाट, धार, पाझर 


औचित्य :- योग्यता, युक्तता, उचीतपणा

औदार्य :- उदारपणा, दातृत्व, दानत, दानशिलाता, सढळता

औक्षण :- ओवाळणे

औद्धत्व :- उद्धटपणा, दांडगेपणा, उर्मटपणा 


अं 

अंगकाठी :- अंगबधा, अंगयष्टी, शरीरयष्टी 

अंगविक्षेप :- हावभाव, हातवारे 

अंगार :- विस्तव, निखारा, इंगळ

अंजली :- ओंजळ 

अंत :- शेवट, समाप्ती, मृत्यू, अखेर 


तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com  या ब्लॉग वे उपलब्ध करून दिले जाईल.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

समानार्थी शब्द | उ - ऐ । marathi synonyms 

समानार्थी शब्द | क - घ । marathi synonyms


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या