स्वाध्याय । पाठ १९. माझी शाळा । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास

 स्वाध्याय । पाठ १९. माझी शाळा 




(अ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) शाळेत कोणते खेळ खेळायला मिळतात ?

👉 खो - खो, कबड्डी, लेझिम यांसारखे खेळ खेळायला मिळतात.

(२) शाळेत कोणत्या सुविधा असतात ? 

👉 शाळेत पुढील सुविधा असतात 

1. ग्रंथालय

2. वाहतूक सुविधा

3. सभागृह 

4. संगणक कक्ष

5. मैदान 

6. समुपदेशक 

7. स्वच्छता गृह 

8. प्रथमोपचार 


(३) वाद कोणत्या मार्गाने सोडवले पाहिजेत ?

👉 वाद शांततेच्या मार्गाने सोडवले पाहिजे. 


(आ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला ....... ची सवय लागते.

👉 शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणा ची सवय लागते.

(२) वाचनालयातील ....... वेळेत परत करावीत. 

👉 वाचनालयातील पुस्तके वेळेत परत करावीत. 

(३) प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची ....... मिळाली पाहिजे.

👉 प्रत्येक मुलामुलीला शाळेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे.


(इ) योग्य वाक्यांपुढे ✓ असे आणि अयोग्य वाक्यापुढे × असे चिन्ह करा.

(१) पुस्तकाची पाने फाडू नयेत. 👉 ✓

(२) खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये. 👉 ×

(३) शाळा सर्वासाठी असते. 👉 ✓


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ १८. माझे कुटुंब आणि घर  ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ २०. आपले समुहजीवन । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या