8 मोलाचे अन्न स्वाध्याय
मोलाचं अन्न स्वाध्याय | molache anna swadhyay |
तुम्हाला हवी असलेली माहितीसाठी टॉपिक कमेंट करा. ती माहिती लवकरात लवकर आपल्या @learnwithbhavesha.blogspot.com या ब्लॉग वर उपलब्ध करून दिले जाईल.
(अ) काय करावे बरे ?
डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे.
👉 डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलातून येते.
(आ) माहिती मिळवा.
१. समुद्राच्या पाण्यातून मीठ तयार होते, त्या ठिकाणाला काय म्हणतात.
👉 समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर म्हणतात.
२. शेतीमध्ये बटाट्याचे पीक घेतले, तर बटाटे जमिनीखाली तयार होतात. मुळाही जमिनीखाली तयार होतो. वनस्पतीपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात ?
👉 वनस्पतीपासून बटाटे व मुळा याचप्रमाणे गाजर, बीट, अद्रक ही कंदमुळे मिळतात.
३. कणगी म्हणजे काय ? त्याच्या शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो ?
👉 कणगी म्हणजे धान्य साठविण्याची जागा. शेतकऱ्याला कणगीचा धान्य साठवण्यासाठी उपयोग होतो.
४. शेतकरी तिफन नावाचे आवाज कशासाठी वापरतात.
👉 शेतकरी तिफन नावाचे अवजार पेरणी करण्यासाठी वापरतात.
५. लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ? ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात ?
👉 लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी लिंबू, पाणी, साखर, मीठ इत्यादि पदार्थ लागतात. लिंबू भाजीवल्याकडे मिळतो. पाणी नळाद्वारे मिळते. साखर किराणा दुकानात मिळते.
(इ) पुढील तक्ता पूर्ण करा.
👉
(ई) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
१. जमिनीचा .......... झाला की पेरणी करतात.
👉 जमिनीचा वाफसा झाला की पेरणी करतात.
२. कणसापासून बाजरीचे दाने सुटे करायच्या कामाला ........... म्हणतात.
👉 कणसापासून बाजरीचे दाने सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात.
३. वाऱ्याने हलकी ............ उडून दूर जातात.
👉 वाऱ्याने हलकी टरफले उडून दूर जातात.
४. काही लोक बोरे, करवंद अशी ...... जंगलातून गोळा करून विकतात.
👉 काही लोक बोरे, करवंद अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात.
५. अन्न उत्पादनात व वाहातूक करतांना यंत्रे व वाहाने वापरतात. ती चालवण्यासाठी ...... वर खर्च होतो.
👉 अन्न उत्पादनात व वाहातूक करतांना यंत्रे व वाहाने वापरतात. ती चालवण्यासाठी इंधना वर खर्च होतो.
(उ) थोडक्यात उत्तरे लिहा.
१. बाबा जमिनीची मशागत कशी करतात ?
👉 बाबा ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून प्रथम शेत नांगरतात, मातीची ढेकळे फोडतात. जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात. अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात.
२. धान्य साऱ्या देशभर कसे पोहचवले जाते ?
👉 धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांद्वारे धान्य देशभर पोहचवले जाते.
३. अन्न वाया का घालवायचे नाही ?
👉 अनेक लोकांच्या परिश्रमातून अन्न आपल्यापर्यंत पोहोचते. जसेकी शेतकरी, ट्रक चालक, हमाल इत्यादी व्यक्ती अन्न आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम करतात. यामुळे अन्न वाया घालवायचे नाही.
४. घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते ?
👉 घरात धान्य आल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे, स्वच्छ करणे, पीठ करणे, पीठ मळणे, भाकरी थापणे व भाजणे इत्यादी कामे करावी लागतात.
(ऊ) जोड्या लावा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या