नरक चतुर्दशी माहिती मराठीत
🪔 शुभ दीपावली 🪔
भागवतात अशी कथा आहे की, पूर्वकाली नरकासूर नावाचा एक असुर प्राग्ज्योतिषपूर येथे राज्य करीत होता. मिळालेल्या वराने तो बलाढ्य झाला होता. त्याने इंद्राचे छत्र, आदितीची कुंडले आणि अमर पर्वतावरील मणिपर्व नावाचे स्थान हरण केले. देव व मानव यांस तो पिडा देऊ लगला. आपण अजिंक्य व्हावे म्हणून त्याने आपल्या राजधानीच्या सभोवती पर्वतांचे व शस्त्रांचे कोट रचले.
हा दुष्ट दैत्य स्त्रीयांस पिडा देऊ लागला. जिंकून आणलेल्या सोळा सहस्त्र उपवर स्त्रीयांना त्याने तुरुंगात कोंडून ठेवले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. ही बातमी श्रीकृष्णाला समजताच सत्यभामेला बरोबर घेऊन गरुडावर बसून असुराच्या दुर्गावर हल्ला केला. नरकासुराला ठार केले. सर्व स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने लोकांकडून हरण केलेले धन परत केले. मुक्तता केलेल्या स्त्रीयांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांच्याशी विवाह केला (आपले नाव दिले). नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुराला ठार करुन त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळास लावला होता पहाटे घरी आल्यावर नंदाने त्यास मंगल स्नान घातले होते. या घटनेचे स्मरण म्हणून दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याचा प्रघात पडला.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या