स्वाध्याय । ३. पृथ्वीवरील सजीव । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Pruthvivaril Sajiv Swadhyay 5vi

 स्वाध्याय । ३. पृथ्वीवरील सजीव  



१. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते ?

👉 एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते.

आ) एकपेशीय सजीव कोठे निर्माण झाले ?

👉 एकपेशीय सजीव पाण्यात निर्माण झाले.


२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले ?

👉 सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अतितप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान व चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन झाले. या विभाजनातून सूर्य व त्याच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

आ) प्राण्यांची दोन वैशिष्ट्ये लिहा. 

👉 1. प्राणी श्वासोच्छ्वास करतात. 

2. प्राणी अन्न मिळविण्यासाठी व अन्य कारणांसाठी हालचाल करतात.


३. पुढील चौकटीत लपलेल्या पाच ग्रहांची नावे शोधून त्यांभोवती गोल करा.




👉 



४. पुढील घटना कालानुक्रमे लिहा. 

(अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली. 

(आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. 

(इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले.

(ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.

👉 १. (ई) तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला.

२. (आ) सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले.

३. (अ) पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली.

४. (इ) अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले.

 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । २. इतिहास आणि कालसंकल्पना । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ ४. उत्क्रांती  ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Utkranti 5vi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या