14 स्वयंपाक घरात जाऊया स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Swayampak Gharat Jauya Swadhyay 3 ri

 14 स्वयंपाक घरात जाऊया स्वाध्याय 

14 स्वयंपाक घरात जाऊया स्वाध्याय 3 री परिसर अभ्यास | Swayampak Gharat Jauya Swadhyay 3 ri 

(अ) काय करावे बरे ? 

स्वयंपाक घरात कोळशांची शेगडी वापरल्याने भिंती काळ्या पडलेल्या आहेत. 

👉 स्वयंपाकासाठी गॅस चा वापर करावा किंवा स्वयंपाक घराला खिडक्या ठेवाव्यात.


(आ) जरा डोके चालवा.

(१) पुढील अन्नपदार्थ तयार करताना शिजवण्याचा कोणता प्रकार वापरतात ? 

(१) ढोकळा, (२) आमटी, (३) करंजी, (४) थालीपीठ, (५) बासुंदी, (६) रस्सा.

👉 (१) ढोकळा :- वाफवणे 

 (२) आमटी :- उकळणे 

(३) करंजी :- तळणे 

 (४) थालीपीठ :- भाजणे  

(५) बासुंदी :- उकळणे 

(६) रस्सा :- उकळणे 


(२) दुधापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांची यादी तयार करा.

👉  १. दही, २. बासुंदी, ३. लस्सी, ४. ताक, ५. पनीर, ६. आइस्क्रीम, ७. तूप, ८. श्रीखंड, ९. गुलाबजाम, १०. लोणी, ११. पेढा, १२. बर्फी.

(३) हरभरा वापरून कोणकोणते अन्नपदार्थ बनवतात ?

👉 हरभऱ्यापासून फुटाणे, उसळ, पुरणपोळी करतात. हरभऱ्याचे पीठ म्हणजेच बेसनापासून शेव, भजी, फरसाण, ढोकळा, पिठले, थालिपीठ इत्यादी अन्नपदार्थ बनवतात. 

(४) भाजी मंडईतून आणलेल्या काही भाज्या आपण न शिजवता खातो. अशा भाज्यांची यादी करा.

👉 काकडी, कोथिंबीर, बीट, बटाटे, गाजर, मुळा, मेथी, कोबी, टोमॅटो, इत्यादी 


(इ) थोडक्यात उत्तरे दया.

(१) अन्नपदार्थ बनवताना उष्णता दिल्याने कोणते फायदे होतात ?

👉 अन्नपदार्थ उष्णता देवून बनवल्याने पचायला हलके होतात. व ते रुचकर बनतात.

(२) सरपण वापरल्याने परिसराची काय हानी होते ? 

👉 सरपणाचा धूर होतो. तो हवेत मिसळून हवा प्रदूषित होते. तसेच सरपण मिसळण्यासाठी झाडे तोडावी लागतात. त्यामुळे परिसराची हानी होते.

(३) स्वयंपाकासाठी गॅस वापरण्याचे फायदे कोणते ?

👉 गॅसचा धूर होत नाही. तो पटकन पेटतो. स्वयंपाक करायल वेळही कमी लागतो.


(ई) माहिती मिळवा.

दुधापासून खवा कसा तयार करतात त्याची माहिती घ्या. ती लिहून काढा आणि वर्गातील इतरांना सांगा.

👉 १. एका कढई मध्ये दूध घ्या.

२. कढईला उष्णता द्या.

३. दुध करपू नये म्हणून सतत ढवळत राहा.

४. दुध घट्ट होईपर्यंत त्याला आटवा.

५. घट्ट झाल्यानंतर थंड करा.

६. खवा तयार होतो.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ १३. आपला आहार  ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास  

स्वाध्याय ।  पाठ १५. आपले शरीर ।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या