स्वाध्याय । पाठ १३. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Badashahachya Hatavar Turi Dilya 4 thi

 स्वाध्याय । पाठ १३. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या 



१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) शिवराय बादशहाच्या दरबारात गेले, त्या   दिवशी औरंगजेब बादशहाचा ............. वाढदिवस होता.

(पन्नासावा, चाळीसावा, साठवा) 

👉 शिवराय बादशहाच्या दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा पन्नासावा वाढदिवस होता.

(आ)आग्र्याहून येताना संभाजीराजांना ......... एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. 

(झाशीत, मथुरेत, दिल्लीत)

👉 आग्र्याहून येताना संभाजीराजांना मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. 


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला ?

👉 आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार आपल्या मातोश्री जिजाबाईंच्या हाती सोपवला.

(आ) आग्र्याच्या  कैदेत शिवरायांच्या बरोबर कोण कोण राहिले ?

👉 आग्र्याच्या कैदेत शिवरायांसोबत हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक आणि संभाजीराजे राहिले.

(इ) आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय केले ?

👉 आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली.


३. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. 

(अ) शिवराय औरंगजेबाच्या दरबारात रागारागाने बाहेर का पडले ?

👉1. सल्लामसलतीच्या महालात औरंगजेबासमोर निवडक सरदार आपापल्या मानाप्रमाणे रांगेत उभे होते. 

2. बादशाहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. 

3. आपण ज्यांना पळवून लावले, अशा जसवंतसिंग राठोडसारख्यांना पुढील रांगेत आणि आपण महाराष्ट्राचे राजे असूनही बादशाहाने आपल्याला मागील रांगेत उभे केले. या अपमानाची चीड येऊन शिवराय औरंगजेबाच्या दरबारातून रागारागाने बाहेर पडले.

(आ) शिवरायांनी आपली सुटका करून घेण्यासाठी कोणती युक्ती केली ?

👉 1. कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली. 

2. पहारेकरी प्रथम ते पेटारे तपासून पाहत असत; पण पुढे पुढे ते कंटाळलें व पेटारे उघडून पाहीनासे झाले. 

3. ही संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी पेटाऱ्यांतून पसार झाले. अशा रितीने शिवरायांनी युक्तीने आपली सुटका करून घेतली.



हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १२. पुरंदरचा वेढा व तह। इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय ।  पाठ १४. गड आला, पण सिंह गेला ।  इयत्ता :- ४ थी  ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या