स्वाध्याय । पाठ १४. गड आला, पण सिंह गेला । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Gad Ala Pan Sinh Gela Swadhyay 5 vi

 स्वाध्याय । पाठ १४. गड आला, पण सिंह गेला 



१. अचूक पर्यायाचे वर्तुळ रंगवा.

(अ) तानाजी हा कोकणातील या गावचा राहाणार होता.

(१) महाड ⚪ (२) चिपळूण ⚪

(३) उमरठे 🔴 (४) रत्नागिरी ⚪

(आ ) जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता.

(१) पुरंदर ⚪ (२) कोंढाणा 🔴

(३) रायगड ⚪ (४) प्रतापगड ⚪

(इ)  तानाजीच्या भावाचे नाव हे होते.

(१) रायबा ⚪ (२) सूर्याजी 🔴

(३) मुरारबाजी ⚪ (४) फिरंगोजी 


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 

(अ) कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ?

👉  कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. 

(आ) कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या ?

👉 "कोंढाणा सारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे." असे कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना म्हणाल्या.

 (इ) 'आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे' असे कोण म्हणाले ?

👉 'आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे' असे तानाजी शिवरायांना म्हणाले.


३. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्या वेळी शिवराय काय म्हणाले ?

👉 शेलारमामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्या वेळी शिवराय म्हणाले, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही जातीने कोंढाणाच्या कामगिरीवर जाणार अहोत.

(आ) सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला ?

👉 तानाजी पडल्यावर धीर खचलेल्या आणि पळणाऱ्या मावळ्यांना आडवा जाऊन सूर्याजी म्हणाला, 'अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा. " मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा; नाहीतर शत्रूवर तुटून पडा."


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १३. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ १५. एक अपूर्व सोहळा । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या