स्वाध्याय । पाठ ११. शायिस्ताखानाची फजिती । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Shahistakhanachi Fajiti Swadhyay 4 thi

 स्वाध्याय । पाठ ११. शायिस्ताखानाची फजिती 



१. रिकाम्या जागी कांसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) शायिस्ताखानाने ...... किल्ल्याचा वेढा दिला.

👉 शाहिस्तेखानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला.

(आ) शायिस्ताखानाने पुण्यात ....... मुक्काम ठोकला.

👉 शाहिस्तेखानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला.

(इ) औरंगजेब बादशाहाने शायिस्ताखानाची रवानगी ..... केली.

👉 औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी कर्नाटकमध्ये केली


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) शायिस्ताखान कोणती गावे घेत पुण्याला आला ?

👉 शाहिस्तेखान शिरवळ, शिवापूर, सासवड, चाकण अशी गावी घेत पुण्याला आला.

(आ) शायिस्ताखानाचे सैन्य हैराण का झाले ?

👉 मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्तेखानाची सैन्य हैराण झाले.

(इ) शायिस्ताखानाला कोणती भीती वाटू लागली ?

👉 आज आपली बोटे तुटली,  उद्या आपली शीर शिवाजी कापून नेईल अशी शाहिस्तेखानाला भीती वाटू लागली.


३. करणे लिहा.

(अ) औरंगजेब बादशाहा  शिवरायांवर चिडला .

👉 आदिलशाहीशी तह झाल्यावर शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले. त्यांनी मुघलांच्या मूलखावर स्वाऱ्या केल्या त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला.

(आ) शायिस्ताखान खिडकीवाटे पळू लागला.

👉 युक्ती करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी तलवार उपसलेली पाहून, शाहिस्तेखान घाबरला व ओरडत  खिडकीवाटे पळू लागला.


४. घटना कालानुक्रमे लावा.

(अ) शिवराय आणि त्यांची माणसे सिंहांकडे निघून गेली.

(आ) शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

(इ)  शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला.

(ई)  शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली.

👉 1. शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला.

2. शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला.

3. शिवरायांनी शाहिस्तेखानाची खोड मोडली.

4. शिवराय आणि त्यांची माणसे सिंहाकडे निघून गेली.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १०. शर्थीने खिंड लढविली । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ १२. पुरंदरचा वेढा व तह। इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या