स्वाध्याय । पाठ २३. वय जसजसे वाढते । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास

 स्वाध्याय ।  पाठ २३. वय जसजसे वाढते 




(अ) काय करावे बरे ?

एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आई - बाबांपेक्षा वयाने मोठी आहे का लहान आहे याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे.

👉 अनोळखी व्यक्ती माझ्या आई बाबांपेक्षा लहान आहे की मोठी आहे हे निरीक्षणावरून आणि त्यांच्या बोलण्यावरून समजते. यासाठी पुढील

निरीक्षणे करू:

1. केस पिकले आहेत की टक्कल पडले आहे.

 2. दात- व्यवस्थित आहेत की पडले आहेत.ता

3. चालतांना, उठताना, बसताना शरीराच्या होणाऱ्या हालचाली.  

4. ही व्यक्ती बोलताना आई-बाबांना आदर देऊन बोलत असेल, ताई,

दादासाहेब असे म्हणत असेल, तर ती आई-बाबांपेक्षा लहान असेल. जर आई बाबांना अरे, अगं असे म्हणत असेल, तर त्यांच्यापेक्षा ती मोठी असेल. अशा रितीने काही अंदाज बांधता येतील.


(आ) जरा डोके चालवा.

(१) मांजर आपली पिल्ले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी हलवते?

👉 मांजर आपल्या छोट्या पिल्लांना मानेजवळ तोंडाने अलगद पकडते. तोंडानेच अगदी हळुवारपणे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पिल्लांना हलवते. आईचे दात तिच्या पिल्लांना लागत नाही.

(२) म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात. काही आजोबांच्या केसांमध्ये म्हातारपणाची आणखी एक खूण दिसते. ती कोणती ?

👉 म्हातारपणात केस विरळ होतात. काही जणांना टक्कल पडते. हे म्हातारपणाची आणखी एक खूण आहे.

(३) म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो ?

👉 म्हातारपणात त्वचा कोरडी पडते. तिच्यावर सुरकुत्या पडतात त्वच काळवंडते.

(४) उसळी करण्यासाठी मूग, मटकी, चवळी इत्यादी कडधान्ये भिजत घालून त्यांना मोड आणतात त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापरलं ?

👉 मुग, मटकी, चवळी अशा कडधान्यांना एक ते दीड दिवसात मोड आणले जातात यालाच बीजांकुरण असेही म्हणतात.


(इ) चित्र काढा.

वाटण्याच्या फळाचे  आणि बीचे चित्र काढा. 

👉 वाटण्याच्या फळाला आपण शेंग म्हणतो.

आणि बीला वाटाणा म्हणतो.



(ई) गाळलेले शब्द भरा.

१) घरात बाळ जन्माला येते त्याचा घर दाराला ...... होतो.

👉घरात बाळ जन्माला येते त्याचा घर दाराला आनंद होतो.

२) नियमित ..... केला तर त्याचा फायदा होतो.

👉 नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो . 

३) फुलांपासून ... तयार होतात.

👉 फुलांपासून फळे तयार होतात. 


(ई) चूक की बरोबर ते सांगा. 

(१) वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. 

👉 बरोबर. 

(२) वयाच्या सात्तराव्या वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते. 

👉 चूक.

(३) अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते. 

👉 चूक.

(४) मातीतले पाणी आणि  काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात.

👉 बरोबर.


हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय । पाठ २२. आपल्या गरजा कोण पुरवतात ? । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 

स्वाध्याय । पाठ २४. आपले कपडे। इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास 



 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या